पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shivaji Nagar Pune Crime News | ज्युपीटर किंवा होंडा स्कुटर विकत देतो, असे सांगून ऑनलाईन पैसे घेऊन स्कुटर न देता, ५६ हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Cheating Fraud Case)
याबाबत राजेंद्र श्रीधर आफळे (वय ५५, रा. दामोदर संकुल, दामोदरनगर, हिंगणे खुर्द) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रफुल्ल उबाळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर गावठाण (Shivaji Nagar Gaothan) येथील माणकर बिल्डिंग येथे २१ ऑक्टोबर रोजी घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल उबाळे याने फिर्यादी आफळे यांना ज्युपीटर किंवा होंडा स्कुटर विकत देतो, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून आफळे यांनी त्याला ऑनलाईन गुगल पे द्वारे ५६ हजार रुपये दिले. त्यानंतर गाडी देण्यास उबाळे याने टाळाटाळ केली. त्यानंतर आफळे यांनी पैसे परत मागितले. उबाळे याने पैसे परत न करता फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक कैलास दाबेराव (API Kailas Daberao) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#
Rahul Gandhi | राहूल गांधी यांना पुणे न्यायालयात हजर रहाण्यास मुदतवाढ !!
BJP Observers For Maharashtra | भाजपकडून 2 निरीक्षकांची नियुक्ती; उद्या रात्री मुंबईत होणार दाखल