पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shivaji Nagar Pune Crime News | शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रेमभंगातून या तरुणाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. (Suicide Case)
ऋषिकेश दादा कोकणे (वय १९, रा. ई ब्लॉक, चौथा मजला शिवाजीनगर पोलीस वसाहत) असे या तरुणाचे नाव आहे. तो एस वाय बीएला शिकत होता. त्याचे वडिल दादा कोकणे हे सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.