Shivaji Nagar Pune Crime News | पुणे: पैसे पाठवल्याचा खोटा मेसेज करुन तरुणाची फसवणूक, शिवाजीनगर पोलिसांकडून भामट्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivaji Nagar Pune Crime News | पैसे पाठवल्याचा खोटा मेसेज करुन तो खरा असल्याचे भासवून तरुणाची 75 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) करणाऱ्या भामट्याला शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Station) अटक केली आहे. हा प्रकार 4 जून रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास मॉडर्न कॉलेज रोडवर (Modern College Road) घडला होता. ओंकार हनुमंत शिंदे (Omkar Hanumant Shinde) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Arrest In Cheating Fraud Case)

याबाबत शुभम मिलिंद मंगरुळकर (वय-28 रा. मॉडर्न कॉलेज रोड, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीवर आयपीसी 406, 420, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन पैसे जमा झाल्याचा खोटा मेसेज खरा असल्याचे भासवले. त्यानंतर आयफोन 14 प्रो कंपनीचा 75 हजार रुपयांचा मोबाईल घेऊन गेला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शुभम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस करीत आहेत.(Shivaji Nagar Pune Crime News)

नफा मिळवण्याच्या नादात गमावले पैसे

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 5 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) सायबर चोरट्यांविरोधात (Cyber Thieves) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत धानोरी येथे राहणाऱ्या 41 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 31 मार्च ते 13 जून या कलावधीत ऑनलाईन घडला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे फडणवीस का नव्हते? अजित पवार म्हणाले…

Indapur Pune News | देशात उंच घोड्यामध्ये नावलौकिक असलेल्या ‘सिंकदर’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Excise Department Pune | पुणे : पोर्शे कार अपघातानंतर उत्पादन शुल्क विभागाला आली जाग, 68 हॉटेल व पबचे परवाने रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव