Shivaji Nagar Pune Crime News | बलात्काराच्या केसमधील महिलेचे नाव वगळण्यासाठी प्रायव्हेट व्हिडिओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shivaji Nagar Pune Crime News | बलात्काराच्या केसमधील (Rape Case) आरोपी पुरुषाबरोबर असलेल्या महिलेचे नाव वगळण्यासाठी प्रायव्हेट व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी पिडितेला देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी एका २९ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पिंपरीमधील नेहरुनगरमध्ये (Nehru Nagar Pimpri) राहणार्‍या दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सांगली येथे काम करतात. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २८ फेब्रुवारी २०२३ रोजी फईम ऊर्फ फहिमुद्दीन नईम सय्यद व एका महिलेविरोधात बलात्काराची फिर्याद दिली होती. या महिलेला फईम याने पुण्यात बोलावून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे. या गुन्ह्यात फिर्यादी व फईम याचे प्रायव्हेट व्हिडिओ व फोटो असल्याचा उल्लेख आहे. फईम याने फिर्यादी यांना फसवणूक करुन ते काढलेले आहेत. २९ जुलै २०२४ रोजी फिर्यादी यांच्या दाजीच्या मोबाईलवर व्हॉटसअ‍ॅपवर फिर्यादी व फईम यांचे प्रायव्हेट व्हिडिओ वन टाईम व्ह्यु करुन पहाता येतील असे पाठविले.

फईम याची पत्नी ही मागील दोन महिन्यांपासून फिर्यादीच्या दाजींना फोन करुन धमक्या देत आहे. फिर्यादी यांनी दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. या गुन्ह्यातील फईमच्या पत्नीची आई आरोपी आहे. तिचे नाव मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहे. जर केस मागे घेतली नाही तर फईम आणि फिर्यादी यांचे प्रायव्हेट व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आहे. त्यासाठी तिने गावाकडील मस्जिद मदिना यांचे विश्वस्त लोकांना भेटून त्यांच्या केसमधून आपल्या आईचे नाव काढून टाकायला सांगावे, असे सांगितले. त्या विश्वस्तांनी ही बाब फिर्यादीच्या आईवडिलांच्या कानावर टाकली. गावात त्यांनी फिर्यादीची बदनामी करुन मानसिक व सामाजिक हानी केल्याने फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेऊन अधिक तपासासाठी सांगली ग्रामीण पोलिसांकडे हस्तांतरीत केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Puja Khedkar | पूजा खेडकरने ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा; IAS पद परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा

Kondhwa Pune Crime News | दुकानावर हल्ला करुन वाहनांची तोडफोड करुन पसरविली दहशत; कोंढव्यातील घटना, चौघांवर गुन्हा दाखल

Yerawada Pune Crime News | गुंड सुधीर गवस खूनाचा बदला घेण्यासाठी वाहनांची तोडफोड; येरवड्यातील जयप्रकाशनगरमधील पहाटेची घटना, तरुणाच्या खूनाचा प्रयत्न