पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | पतीने आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्या नातेवाईकांना पाठवल्याचा घृणास्पद प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी आरोपी पती याच्या विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत शनिपार परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणीने पोलिसांना फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीच्या पतीने दहा महिन्यांपूर्वी व्हाट्सऍपवर व्हिडीओ कॉल करून बदनामी करण्याची धमकी देत अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडले. (Shivaji Nagar Pune Crime News)
आरोपीने व्हिडीओ कॉल सुरु असताना स्क्रीन रेकॉर्डिंग केले. ते रेकॉर्डिंग पीडितेच्या नातेवाई, भाऊ, चुलते, दाजी, मैत्रीण यांना पाठवले. तसेच वरील सर्वांना फोन करून हा व्हिडीओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घोडके हे करत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Modi Cabinet 2024 | मंत्रिमंडळात समावेशासाठी कोणा-कोणाला आले फोन, जाणून घ्या
Jayant Patil On BJP | “… भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला ” जयंत पाटील यांचा भाजपावर निशाणा