Shivaji Nagar Pune Crime | पुणे : मत्स्य व्यवसायात गुंतवणुकीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivaji Nagar Pune Crime | मत्स्य व्यवसायात गुंतवणूक केल्यास चागंला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून (Lure Of Good Returns) एका ज्येष्ठ नागरिकाची 9 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 12 मे 2023 ते 23 एप्रिल दरम्यान शिवाजीनगर (Shivaji Nagar Pune) भागातील मॉडेल कॉलनी (Model Colony Pune) येथील कॅपिटल एक्सप्रेस कंपनीत (Capital Express Company) घडला आहे.

याबाबत शरदनारायण पाठक (वय-79 रा. मयुर कॉलनी, कोथरुड, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सागर प्रदीप कोठारी Sagar Pradeep Kothari (वय-35 रा. हरमेस सेंटर, वाशी नवी मुंबई) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Shivaji Nagar Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन कॅपिटल एक्सप्रेस कंपनीच्या मत्स्य व्यवसायात
गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो असे सांगितले.
त्यानुसार फिर्य़ादी व साक्षिदार यांच्याकडून 9 लाख रुपये बँक खात्यावर घेतली.
पैसे घेतल्यानंतर आरोपीने फिर्यादी व साक्षीदार यांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही.

त्यामुळे फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना कंपनीचे न वठणारे पोस्ट डेटेड चेक दिले.
फिर्य़ादी यांनी धनादेश बँकेत जमा केले असता ते बाऊन्स झाले. त्यानंतर पाठक यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली.
त्यावेळी कोठारी याने उडवाउडवीची उत्तरे देऊन आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड (API Ratnadeep Gaikwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Keshav Upadhye-Pune BJP | संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट, जनताच यशस्वी होऊ देणार नाही ! भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा रोखठोक इशारा

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | अमोल कोल्हेंनी उडवली आढळरावांची खिल्ली, म्हणाले ”ते रडीचा डाव खेळत आहेत, थ्री इडियट चित्रपटातील…”

Cheating Fraud Case Pune | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडे आठ लाखांची फसवणूक