Shivaji Nagar Pune Crime | पुणे : ‘तुझी जास्त नाटकं झाली’ म्हणत डोक्यात कोयत्याने वार, दोन सराईत गुन्हेगारांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivaji Nagar Pune Crime | ‘तुझी जास्त नाटकं झाली, माझ्याकडे काय बघतो’ असे म्हणून तीन जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण (Bedum Marhan) केली. तसेच डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले (Attempt To Murder). याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police) तीन जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. हा प्रकार शिवाजीनगर फॅमिली कोर्ट (Shivaji Nagar Family Court Gate) गेट समोर शुक्रवारी (दि.12) दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

याबाबत हर्षद आप्पा ढेरे (वय-22 रा. अरण्येश्वर, सहकारनगर) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अन्वर शाकीर शेख उर्फ झंब्या Anwar Shakir Sheikh alias Jhambya, ओंकार दयानंद पवार Omkar Dayanand Pawar (दोघे रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी, पुणे) व त्यांच्या एका साथीदारावर आयपीसी 307, 324, 323, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अन्वर शेख व ओंकार पवार यांना अटक केली आहे. अन्वर शेख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Police Records) असून त्याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास आरोपी हे हर्षद ढेरे याच्याजवळ आले.
दोन ते तीन वेळा तुझी जास्त नाटकं झाली आहेत, माझ्याकडे काय बघतोस असे म्हणून हर्षदला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने हातातील चावी हर्षदच्या उजव्या कानाच्या मागे घुसवून जखमी केले. तर ओंकार पवार याने त्याठिकाणी पडलेला सिमेंटचा ब्लॉक हर्षदच्या डोक्यात मारला. (Shivaji Nagar Pune Crime)

यामुळे हर्षद चक्कर येऊन खाली पडला.
त्यानंतर पवार याने तुझा जीवच घेतो असे म्हणून सोबत
आलेल्या कोयत्याने हर्षदच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
त्यानंतर आरोपी त्यांच्या साथीदाराच्या गाडीवर बसून पळून गेले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डाबेराव करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त