‘माझी नव्हे तुमचीच मस्ती जिरली’, शिवाजीराव आढळराव पाटलांचा अजित पवारांना ‘टोला’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभेत अनेक नवनवीन आणि मोठ्या घडामोडी घडल्या. त्यात तीन वेळचे शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव त्यांना धक्का देणारा होता. राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांना चीतपट केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीका केली होती. लोकसभेतील पराभवामुळे आढळराव पाटील यांची ‘मस्ती जिरली’, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर शिवाजीराव आढळराव पाटीलांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुलाच्या पराभवाने अजित पवारांचे तोंड काळवंडले असून ‘मस्ती माझी नाही तर, मस्ती तुमची जिरली’ आहे, अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. शिवाजीराव आढळराव हे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली. स्वत:च्या मुलाला निवडून आणता आले नाही म्हणून त्याच्या पराभवाने अजित पवारांचे तोंड काळवंडले आहे, असं त्यांनी म्हटलं. तसंच अजित पवार यांच्याकडुन माझ्यावर टिका झाली. परंतु ज्यांच्या मुलाला मावळ लोकसभा मतदार संघातून निवडून आणता आलं नाही त्यांनी माझ्यावर टीका करणे हा विनोद आहे, असं शिवाजीराव आढळराव पाटलांनी म्हटलं.

तसंच लोकसभा निवडणुकांच्या वेळी अजित पवार यांनी पार्थ पडला तर राजकारण सोडेल असं वक्तव्य केले होते. या फक्त तोंडाच्या वाफा आहेत. तसंच अजित पवार यांना घरचा पक्ष फोडणारा माणुस असल्याचेही त्यांनी म्हटलं. मी नम्रतेने वागणारा माणुस आहे. मी कधी अहंकाराने वागत नाही, माझ्या पक्षात माझा चांगला सन्मान असुन माझ्या पराभवाची चिंता तुम्ही करु नये, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, तुम्ही हे लक्षात ठेवा, माझ्या शिवसेना पक्षाचे राज्यात १८ खासदार आहेत. तुमच्या पक्षाच्या फक्त ४ खासदार आहे. माझा पराभव झाला हे मला मान्य आहे. परंतु जे निवडून आले ते केवळ मालिकेमुळे निवडून आले आहेत. पराभवानंतरही पक्षाने माझा योग्य सन्मान केला आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

आरोग्यविषयक वृत्त