Shivajirao Adhalarao Patil | आढळरावांचा खळबळजनक आरोप; म्हणाले – ‘गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता संपवून टाकण्याची धमकी देतो’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivajirao Adhalarao Patil | ‘गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता शिवसैनिकाला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवला म्हणून संपवून टाकण्याची धमकी देतो,’ असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते (Shiv Sena) आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर केला आहे. तर, ‘आमचं पक्षाला इतकंच सांगणं आहे की, राज्यात आघाडी सरकार आहे, तर तुमचं चालू द्या, फक्त आम्हाला जिल्ह्यात जगू द्या,’ असं आढळराव पाटलांनी म्हटलं आहे.

 

काय म्हणाले आढळराव पाटील?

‘याच जिल्ह्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा उजवा हात असलेल्या कार्यकर्त्याने 4 दिवसापूर्वी माझ्या एका कार्यकर्त्याला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवलं म्हणून धमकावलं. त्याला मारण्याची धमकी दिली. तुला गावात राहायचं का, तुला संपवून टाकू अशी धमकी गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता करतो आहे. आमचं पक्षाला इतकंच सांगणं आहे की राज्यात आघाडीचं सरकार आहे तर तुमचं चालू द्या, फक्त जिल्ह्यात आम्हाला जगू द्या, आम्हाला मारू नका. आघाडीने याबाबत मित्रपक्षांना सांगावं.’ असं शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी म्हटलं.

 

पुढे आढळराव पाटील म्हणाले, ‘माझा शिवसेनेचा खेड तालुक्याचा पंचायत समिती सभापती 6 महिन्यांपासून तुरुंगात सडतो आहे. त्याच्यावर नाहक 307 चा गुन्हा दाखल केला. त्यावर डॉक्टरांचे प्रमाणपत्रही नाही. त्याला जामीन मिळू नये म्हणून राष्ट्रवादीचे (NCP) आमदार आणि इतर नेते दबाव टाकत आहेत. ही गोष्ट मी माझ्या नेत्यांना वेळोवेळी कानावर घातली. त्यांनीही पाहिजे तशी मदत केली. पण, हे चित्र एका बाजूला आहे. शिवसेनेच्या माझ्या सभापतीने काय घोडं मारलं होतं. त्याच्यावर खोटा गुन्हा का दाखल केला. त्याचं संपूर्ण घर तुरुंगात टाकलं, असं ते म्हणाले.

 

 

‘आता आम्ही विकास करू द्या, निधी द्या या मागण्याही करायचं सोडून दिलं आहे. ही बैलगाडी शर्यत बंद करण्याचं कारण काहीच नव्हतं. फक्त शिवसेना नेता शिवाजीराव आढळराव यांनी त्यांच्या गावात शर्यत भरवली हे त्यांच्या डोळ्यात खुपलं म्हणून त्यांनी स्थगिती दिली. कुणाच्या डोळ्यात खुपतं हे सांगण्याची गरज नाही. संपूर्ण जिल्हा आणि राज्याला हे माहिती असल्याचं ते म्हणाले.

 

‘जिल्हाधिकाऱ्यांनी आदल्या दिवशी हे लिहून द्या, ते लिहून द्या म्हणत गावातील यात्रा कमिटीकडून अनेक कागदपत्रे घेतली.
तसेच रात्री माझ्या घरी येऊन बैलगाडी शर्यतीला 50 पेक्षा अधिक माणसं येऊ देणार नाही असं सांगितलं.
यावर मी म्हटलं दिवसभरात जिल्हा बँकेची राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचारसभा झाली.
त्या सभेत 10 हजार लोक होते. ते कसे चालले? असा सवालही आढळराव पाटलांनी उपस्थित केला.
तसेच आघाडीतील घटक पक्षाने आम्हाला पुण्यात संपवण्याचा डाव करू नये,’ असं देखील ते म्हणाले.

 

Web Title :- Shivajirao Adhalarao Patil | serious allegations of shivaji adhalrao patil on dilip walse patil in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा