Shivajirao Adhalarao Patil | ‘मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं’, आढळराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुरमधील काही लोक ‘ढळली’, पण जे खरे ‘अढळ’ आहेत ते माझ्यासोबत आहेत, अशा शब्दात टीका करणाऱ्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं, मी पक्षाबरोबर गेली 18 वर्षे अढळच राहिलो, अशा शब्दात आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. तसेच गरज नसताना चुकीच्या माणसाच्या रिपोर्टिंगनंतर माझी त्यांनी पक्षातून हकालपट्टी झाल्याचं सांगत ठाकरेंचा तो घाव वर्मी लागल्याचे सांगितले.

शिरुर मतदारसंघातील (Shirur Constituency) शिवसैनिकांनी गुरुवारी मातोश्रीवर (Matoshree) जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी मातोश्रीच्या आवारात या सर्व शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ‘ढळली’, पण जे खरे ‘अढळ’ आहेत ते माझ्यासोबत आहेत. असा टोला त्यांनी आढळराव पाटलांना लगावला. तसेच ज्या मतदारसंघात शिवनेरी (Shivneri Fort) आहे तिथे राजकारणातील गद्दार लोक आढळले नाही पाहिजेत, अन्यथा हा शिवसेनेरीचा अपमान असल्याचे त्यांनी शिवसैनिकांना सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर आढळराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी ढळलो नव्हतो, पक्षाने मला ढळायला लावलं. मी पक्षाबरोबर गेली 18 वर्ष अढळच राहिलो. अनेक संकटं आली, अनेक वादळं आली, खूप संघर्ष करावा लागला. परंतु त्या ही परिस्थितीत शिवसेनेबरोबर, बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांबरोबर राहिलो. गेली 18 वर्ष उद्धवजींना साथ दिली. पण 18 वर्षांच्या निष्ठेचं फळ म्हणून कुणाचं तरी ऐकून, कुणाच्या तरी कानी लागून उद्धवजींनी माझी हकालपट्टी केली. हा सगळा प्रकार मला आवडला नाही, महाराष्ट्रालाही हा सगळा प्रकार आवडला नाही, असे आढळराव म्हणाले.

अन् मी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकला

मी पक्षाशी गद्दारी केली नाही, शिवसेनेने माझ्याशी गद्दारी केली नाही. मला गद्दार म्हणायचा कुणाचाही संबंध नाही.
काहीही कारण नसताना पक्षाने माझी हकालपट्टी केली. त्यानंतर दोन तासांनी मला फोन करुन सांगतात मी चुकलो,
माफ करा… शिरुरमध्ये आपल्याला पुन्हा कामाला लागायचं… असा निरोप त्यांनी मला धाडला.
झालं गेलं विसरुन आम्ही पुन्हा कामाला लागलो. पण त्यांना रिपोर्टिंग करणारे लोक चुकीचे आहेत.
त्यामुळेच पक्षाचे नुकसान झालंय.
माझी हकालपट्टी झाल्याने माझे कार्यकर्ते- पदाधिकारी आणि स्वत: मी देखील दुखावलो गेले.
तसेच हिंदुत्वापासून दूर गेलेल्या उद्धव ठाकरेंपासून आपण फारकत घ्यावी,
असा निर्णय झाला अन् मी त्यांना रामराम केला, असेही आढळराव पाटील यांनी सांगितले.

Web Title :- Shivajirao Adhalarao Patil | shivajirao adhalrao patil answer uddhav thackeray over shirur loksabha constituency

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vinayak Raut Vs Ramdas Kadam | विनायक राऊतांनी रामदास कदमांना डिवचले, म्हणाले – ‘रामदास कदम यांनीच शिवसेनेत गद्दारीची कीड रुजवली’