शिवसेनेचे माजी खा. आढळराव पाटलांनी काढली खासदार अमोल कोल्हेंची ‘उंची’, म्हणाले – ‘कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा…’ (व्हिडीओ)

पुणे / मंचर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वरदहस्तामुळे उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचे विधान खासदार अमोल कोल्हे (mp Amol Kolhe) यांनी केले होते. यावरुन महाविकास आघाडीमध्ये असलेल्या वादात आणखी एक भर पडली आहे. दरम्यान, कोल्हे यांच्या विधानाचा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी खरपूस समाचार घेत सणसणीत टोला लगावला आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असताना बाह्यवळणाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांना डावलले गेलेच पण मलाही साधा फोन केला नाही आणि ज्यांनी मोठं केलं त्यांनाच लक्ष केलं. कोल्हेंनी जेवढं स्क्रिप्ट (script) दिलं तेवढेच वाचावं, अशा शब्दांत शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.

लबाड कोल्हा शिवसेनेत मोठा झाला
शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (रविवार) लांडेवाडी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमोल कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यावरून जोरदार हल्ला चढवला. जाहीर कार्यक्रमात थेट मुख्यमंत्र्यांना खासदार अमोल कोल्हे यांनी लक्ष केलं होतं. कोल्हेंनी स्वता:ची लायकी पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून (Shivsena) मोठा झाला आणि आता त्याच शिवसेनेवर बोलायचे हा या माणसातील गुणधर्म आहे का ?, असा सवाल आढळराव यांनी कोल्हेंना केला.

 

यांच्यासारखा नटसम्राटासारखं नाही

आढळराव पाटील पुढे म्हणाले, राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असं समीकरण जोडून लोकांची दिशाभूल केली जाते. मी म्हातारा जरी असतो तरी माझ्याकडे बुद्धीमता, समज आहे. यांच्यासारखा नटसम्राटासारखं नाही, असं म्हणत त्यांनी कोल्हे यांना टोला लगावला.

जास्त बिघाडी इथले राष्ट्रवादीचे नेत करतात
मी खसदार असताना लोकसभेत भांडून 2018 मध्ये माझ्या पाठपुराव्यामुळेच या महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा केला. मार्च 2019 मध्ये या कामाचे भूमिपूजन झालं. माझं श्रेय असताना मला डावललं जात आहे. आता मी खासदार नाही ठीक आहे. परंतु मला उद्घाटनाला किमान फोन तरी करायला पाहिजे होता. जाहिरातीमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरायला पाहिजे होता. पुणे जिल्ह्यात (Pune district) सगळ्यात जास्त बिघाडी इथले राष्ट्रवादीचे नेते (NCP) अमोल कोल्हे, दिलीप मोहिते करतात, असा घणाघाती आरोप आढळराव पाटलांनी केला.

कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले
काल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले.
कोल्ह्यांनी उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेण्याचा प्रयत्न करु नये,
कोल्हेला अडीच लाख पगार आहे. शिवाय हा माणूस म्हणतोय,
शुटिंग केल्या शिवाय माझी चूल पेटत नाही तर मग सकाळी 7 ते संध्याकाळी 7 शुटिंगसाठी निवडून दिलंय ? असा सवाल आढळराव पाटील यांनी केला.

Web Titel :- shivajirao adhalrao patil | former shiv sena mp shivajirao adhalrao patil on ncp leader mp dr amol kolhe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

NPS New Rules | सरकारच्या ‘या’ स्कीममधून तुम्हाला मिळेल 5 लाख रूपयापर्यंतची रक्कम, जाणून घ्या काय आहे नवीन नियम?