Shivajirao Adhalrao Patil | शिवसेना अजूनही गोंधळलेली रात्री हकालपट्टी, सकाळी इन्कार ! शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना (Shivsena) पूर्णपणे गोंधळून गेल्याचे दिसून आले. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तरीही शिवसेना अजूनही सावरलेली दिसून येत नाही. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव -पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तशी बातमी शिवसेनेचे मुखपत्र सामना (Saamana) म्हणून प्रसिद्ध करण्यात आली. या सामना मधील वृत्ताचा हवाला घेऊन सर्व चॅनेलवरुन शिवाजीराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या हकालपट्टीचे वृत्त देण्यात आले.

 

त्यानंतर आता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून खुलासा करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार आणि सचिव विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी खुलासा केला आहे. आज ३ जुलै २०२२ रोजी सामना दैनिकात आलेली बातमी ही अनवधाने छापण्यात आलेली असून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धस देण्यात आलेल्या प्रत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.

शिवसेनेतील निवड, नियुक्ती, उमेदवारांची घोषणा या सामना मधून केल्या जात होत्या.
सामनातील बातमीचा आधार घेऊन नंतर लोक त्याच्या बातम्या प्रसिद्ध करीत असत.
आजवर सामना वृत्तपत्रातून कधीही खुलासा छापण्यात येत नव्हता.
आज प्रथमच शिवसेनेला सामना मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा तातडीने खुलासा करुन इन्कार करण्याची वेळ आली आहे. शिवसेना अजूनही गोंधळलेली आहे, हे त्याचेच उदाहरण ठरावे.

 

Web Title :- Shivajirao Adhalrao Patil | Former Shivsena MP Shivajirao Adhalrao Patil Is In Party Said MP Vinayak Raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

 

RBI On Rs 500 Currency Note | 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयचे वक्तव्य, बँकांना दिले हे महत्वाचे निर्देश