Shivajirao Bhosale Bank Fraud | शिवाजीराव भोसले बँक आर्थिक घोटाळा प्रकरणात साताऱ्यातून आणखी एकाला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivajirao Bhosale Bank Fraud | शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्यात (Shivajirao Bhosale Bank Fraud) बनावट धनादेश (Fake check) दिल्याचे प्रकरण घडले होते. त्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या (Pune Police) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने साताऱ्यातून (Satara) एकाला अटक केली आहे. अमर श्रीरंग जाधव Amar Srirang Jadhav (रा. क्षेत्र माहूली,ता. सातारा) असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
मार्च 2017 मध्ये अनिल भोसले (Anil Bhosale) व मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांच्या बनावट खात्यावरील कर्ज प्रकरणाचे हप्ते भागवण्यासाठी इतर कर्ज प्रकरणे करण्यात आली होती. त्यामध्ये अमर जाधव याच्याही पाच धनादेशाचे वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. जाधवचे धनादेश वापरुन कागदोपत्री नोंदी दाखवून ही फसवणूक केली आहे.
पोलीस तपासामध्ये जाधवचाही भोसले बँकेचा फंड फिरवण्यामध्ये सहभाग असल्याचे समोर झाले आहे.
त्यामुळेच त्याला अटक करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) यांनी सांगितले.
EPFO | तुमच्या PF अकाऊंटमध्ये व्याज आले का? ‘या’ 4 पद्धतीने तात्काळ जाणून घ्या
Narayan Rane | ‘संजय राऊत यांना हिंदुत्व कळले नाही म्हणून शिकवायची वेळ आली’