Shivajirao Bhosale Bank Scam Case | शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणात आमदार अनिल भोसलेंना न्यायालयाचा दणका, जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील (Shivajirao Bhosale Bank Scam Case) मुख्य आरोपी आमदार अनिल शिवाजीराव भोसले (MLA Anil Shivajirao Bhosale) यांचा वैद्यकीय उपचारासाठी केलेला तात्पुरता जामिन अर्ज (Bail Application) फेटाळून लावला (Rejected) आहे. अनिल भोसले यांनी वैद्यकीय उपचारासाठी (Medical Treatment) जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. हिवसे (Special Court Judge R.N. Jealousy) यांनी भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळून (Shivajirao Bhosale Bank Scam Case) लावला आहे.

आमदार अविनाश भोसले यांनी किडनीच्या आजाराचे उपचार ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपलब्ध नाहीत. ते केवळ रुबी हॉल (Ruby Hall) व पूना हॉस्पिटलमध्ये (Poona Hospital) होत आहेत. त्यामुळे कीडनीच्या आजाराचे (Kidney Disease) उपचार करण्यासाठी तात्पुरता जामीन मिळावा यासाठी भोसले यांनी अर्ज केला होता. त्याला गुंतवणूकदारांचे वकील सागर कोठारी (ADV. Sagar Kothari) व सरकारी वकील विलास पठारे (Public Prosecutor Vilas Pathare) यांनी विरोध केला.

याप्रकरणात भोसले यांची पत्नी रेश्मा भोसले या आरोपी असून त्या अद्याप फरार आहेत.
तसेच इतर 12 आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.
आरोपी भोसले हे नियमानुसार सरकारी किंवा खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतात,
असा युक्तिवाद अ‍ॅड. विलास पठारे यांनी केला. तो ग्राह्य धरुन न्यायालयाने अविनाश भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला. (MLA Anil Bhosales Bail Rejected)

Web Title :-  Shivajirao Bhosale Bank Scam Case | shivajirao bhosale bank embezzlement case mla anil bhosales bail rejected pune crime news