400 कोटींचा घोटाळा ! शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना अखेर रद्द; ठेवीदारांना 5 लाख मिळण्याचा मार्ग मोकळा, जाणून घ्या कसा

पुणे : चारशे कोटींचा घोटाळा करणाऱ्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा (shivajirao bhosale cooperative banks) परवाना रद्द करण्यात आला आहे.यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने नुकताच आदेश दिला आहे. दरम्यान, या आदेशामुळे ठेवीदारांना बँक विमा महामंडळामार्फत प्रत्येकी किमान ५ लाख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे (shivajirao bhosale cooperative banks)  २०१८-१९ वर्षाचे ऑडिट करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने Reserve Bank दिले होते. त्यानुसार बँकेचे ऑडिट केले असता, त्यात ७१ कोटी ७८ लाख रुपये कमी असल्याचे आढळले.

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

त्यामुळे आमदार अनिल भोसले, शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप, हनुमान सोरते यांच्यासह ११ पदाधिकाऱ्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची व्याप्ती वाढत गेली. त्यानंतर मुख्य आरोपी आमदार अनिल भोसलेसह सर्वाना अटकही झाली आहे. एवढ्यावरच न थांबता अनिल भोसलेंच्या तीन गाड्याही जप्त करण्यात आल्या होत्या. या सर्वांच्या बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या. बँकेच्या एकूण १४ शाखा असून, ९५ हजार खातेदार आहेत. बँकेकडून आतापर्यंत १२ कोटी रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे.

शरीरातील ऑक्सिजन लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश; निश्चित होईल फायदा, जाणून घ्या

दरम्यान ठेवीदारांनी ठेवी परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. वेळप्रसंगी ठेवीदारांनी आंदोलनेही केली. आता मात्र रिझर्व्ह बँकेने Reserve Bank शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे बँक विमा महामंडळामार्फत प्रत्येकी किमान ५ लाख मिळण्याचा ठेवीदारांचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

Driving License : आता घरबसल्या बनवा तुमचं लर्निंग लायसन्स, जाणून घ्या

 

‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्‍यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या

 

दिलासादायक ! दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त

 

फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या

 

संभाजीराजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले – ‘राज्याभिषेक दिनी 6 जूनला रायगडावर या’

 

सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच