माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (91) बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांनी या वयातही कोरोनावर मात केल्यान नॉन कोरोना वॉर्डात त्यांना दोन दिवसांपूर्वी दाखल केले होते. किडनीच्या विकाराने ते ग्रस्त होत. आज निलंग्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मधुमेह, रक्तदाब, किडणीचा त्रास असताना कोरोनाची लागण झाल्याने डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागातील विलगीकरणात ठेवले होते. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू होत. ते 1985 ते 86 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्वाची मंत्रीपदे भूषवली होती.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचे योगदान होते. स्वातंत्र्य सेनानी म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला होता. मात्र, स्वांतत्र्य सैनिकांना म्हणून मिळणारे निवृत्ती वेतन त्यांनी कधीही घेतले नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like