Shivali Parab | हास्यजत्रा फेम शिवाली परब दिसणार नवीन चित्रपटात; पोस्ट चर्चेत

Shivali Parab | maharashtrachi hasyajatra fame shivali parab new marathi movie ulgulan
File Photo

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra ) यामधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) ही आता लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. आपल्या अचूक विनोदाच्या टामिंगने सर्वांना खळखळून हसायला लावणाऱ्या शिवालीने अनेक पद्धतीच्या भूमिका सादर केल्या आहेत. हास्यजत्रेतील तिच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. आता शिवालीच्या (Shivali Parab) अभिनायची जादू मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

 

शिवालीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. तिच्या या पोस्टवर तिचे चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहे. शिवाली ‘उलगुलान’ (Ulgulan Marathi Movie) या नव्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. तृशांत इंगळे (Trishant Ingle) दिग्दर्शित उलगुलान या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली असून 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

‘उलगुलान’ हा आदिवासी समाजावर भाष्य करणारा मराठी सिनेमा असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक तृशांत इंगळे यांना मागील वर्षी ‘झॉलीवूड’ (Zollywood Movie) चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्म फेअर पुरस्कार (Filmfare Awards) मिळाला आहे. उलगुलान हा शब्द आदिवासी समाजाचे आद्यगुरू बिरसा मुंडा (Birsa Munda) यांनी केलेल्या आंदोलनातून आला आहे. या चित्रपटाचा विषय वेगळा असल्याने प्रेक्षक चित्रपटाची वाट पाहत आहेत.

 

शिवालीने (Shivali Parab) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही माहिती दिली असून
तिच्या चाहत्यांनी चित्रपटासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी शिवाली
‘प्रेम प्रथा धुमशान’ (Prem Pratha Dhumshan) या चित्रपटात दिसली होती.
या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली होती.
या चित्रपटातील तिच्या किसिंग सीनची बरीच चर्चा रंगली होती.
शिवाली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून ती तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती पोस्टमधून चाहत्यांना देत असते.
तसेच अनेकदा ती फोटो व रिल्स शेअर करताना दिसते.

 

Web Title : Shivali Parab | maharashtrachi hasyajatra fame shivali parab new marathi movie ulgulan


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts