Shivali Parab | महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील ‘ही’ अभिनेत्री दिसणार हिंदी जाहिरातीत; व्हिडिओ व्हायरल
पोलीसनामा ऑनलाइन : Shivali Parab | छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ यातील कलाकार आज प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले आहेत. हे कलाकार आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात. या शोमधील कलाकार आज अनेक चित्रपटात देखील झळकताना दिसत आहेत. याच शोमधील अभिनेत्री शिवाली परबने (Shivali Parab) देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
शिवालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या नवीन प्रोजेक्टचा व्हिडिओ शेअर केला आहे. शिवालीला आता एक हिंदी जाहिरात मिळाली असून त्या जाहिरातीमध्ये ती झळकताना दिसत आहेत. ही महिंद्रा फायनान्स ची जाहिरात आहे. यामध्ये शिवालीने कपडे शिवणाऱ्या सामान्य घरातील महिलेची भूमिका साकारली आहे. शिवालीला या जाहिरातीत पाहताच चाहत्यांना फारच आनंद झाल्याचे दिसत आहे. सध्या शिवालीच्या या व्हिडिओवर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.
शिवालीच्या पोस्टवर अनेक कमेंट देखील पाहायला मिळत आहेत. “वा वा शिवा दीदी”, “क्युट शिवाली”,
“अभिनंदन खूप प्रेम” असे एक ना अनेक कमेंट शिवालीच्या (Shivali Parab) या व्हिडिओवर दिसत आहेत.
तर अनेकांनी कमेंट करत शिवालीला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
शिवालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
शिवाली नेहमीच तिच्या नवनवीन प्रोजेक्ट बाबत माहिती सोशल मीडिया मार्फत चाहत्यांना देत असते.
शिवालीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास शिवाली ‘प्रेम, प्रथा धुमशान’ या चित्रपटात झळकली होती.
आता शिवाली महाराष्ट्राची हास्य जत्रेबरोबरच पोस्ट ऑफिस उघड आहे या मालिकेतच्या माध्यमातून
प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
Web Title : Shivali Parab | maharshtrachi hasyajatra fame shivali parab hindi advertise video
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Satara Crime News | येणपेमध्ये रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू