अभिनेत्री शिवानी रांगोळेचं ‘हॉट’ फोटोशुट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे काही दिवसांपूर्वीच आपल्या हॉट फोटोशुटमुळे चर्चेत आली होती. त्यावेळी तिचे काही फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. अनेकांनी तिच्यावर टीकाही केली होती. परंतु कोणत्याही टीकेला न जुमानता तिनं पुन्हा एकदा काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळं ती चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. शिवानीनं शेअर केलेले काही हॉट फोटो पुन्हा एकदा सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

शिवानी रांगोळे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. शिवानीला हॉट फोटोशुट करायला आणि सोशलवरून चाहत्यांसोबत शेअर करायला खूप आवडतं. शिवानीचा हा बोल्ड अँड बिंधास्त अंदाज चाहत्यांनाही खूप आवडतो. काही वेळा ट्रोल झाल्यानंतरही हॉट फोटो शेअर करायला ती जराही डगमगत नाही.

‘मला अशी भन्नाट भूमिका साकारायची खूप इच्छा आहे’

आपल्या भूमिकांविषयी बोलतान शिवानी म्हणते, “कथा उत्तम असेल तर भूमिका साकारताना मजा येते. सगळेच जॉनर हे उत्तम असतात. आतापर्यंत थ्रिलर किंवा कॉमेडी जॉनरमध्ये काम केलं नाही. त्यामुळे मला अशी भन्नाट भूमिका साकारायची खूप इच्छा आहे.” असं ती सांगते.

शिवानी रांगोळेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेजारी शेजारी या मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यात तिनं महुआची भूमिका साकारली होती. बनमस्का या मालिकेमुळं शिवानी घराघरात पोहोचली. फुंतरू आणि अँड जरा हटके सिनेमातून तिनं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं.

 

You might also like