‘या’ कारणामुळं अभिनेत्री शिवानी सुर्वेला झाला भलताच ‘आनंद’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिच्यासाठी 2020 खास ठरताना दिसत आहे. महाराष्ट्राची फेवरेट शिवानीवर या वर्षात पुरस्कारांचा वर्षाव होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या सिटी सिने अवॉर्डमध्ये शिवानाली सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री हा अवॉर्ड मिळाला आहे. 2020 मधील हा शिवानीचा चौथा अवॉर्ड आहे.

https://www.instagram.com/p/B8GgrBHBNC5/

असे झाले शिवानीचे चार अवॉर्ड्स
महाराष्ट्राचा फेवरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात शिवानीला पॉप्युलर फेस ऑफ द ईयर आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री असे दोन अवॉर्ड मिळाले. यानंतर व्हिएतनाममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिच्या जाना ना दिल से दूर या हिंदी मालिकेतील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं तिला गौरवण्यात आलं. यानंतर आता सिटी सिने अवॉर्डमध्ये शिवानीला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

‘माझ्या पुरस्काराचं श्रेय चाहत्यांना जातं’
शिवानीला सिटी सिने अवॉर्ड मिळ्याल्यानंतर ती म्हणाली, “या पुरस्काराचं संपूर्ण श्रेय मी माझ्या चाहत्यांना देते. मी माझ्या फक्त ट्रीपल सीटमधील भूमिकेवर मेहनत घेतली होती. परंतु मला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री पुरस्कार मिळवून देण्यासाठी चाहत्यांनी भरघोस मतदान केलं नसतं तर आज हा पुरस्कार मला मिळाला नसता. त्यामुळे मी माझ्या चाहत्यांची ऋणी आहे.