Shivani Vijay Wadettiwar | बलात्काराला राजकीय हत्यार म्हणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे?, शिवानी वडेट्टीवार यांचा व्हिडिओ व्हायरल (व्हिडिओ)

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे देशभरात भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Vijay Wadettiwar) यांनी सावरकर यांच्याबद्दल एक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत. शिवानी वडेट्टीवार (Shivani Vijay Wadettiwar) यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शिवानी वडेट्टीवार (Shivani Vijay Wadettiwar) यांनी, बलात्कार (Rape) हे राजकीय शस्त्र (Political Weapon) असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरले पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते, असे म्हटले आहे. तसेच या विचारामुळे महिलांना भीती वाटत असल्याचेही त्या बोलताना दिसून येत आहेत. शिवानी वडेट्टीवार या प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव असून त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

शिवानी वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शिवसेना (Shivsena)-भाजपने काढलेल्या सावरकर गौरव यात्रेबद्दल (Savarkar Gaurav Yatra) बोलताना दिसत आहेत. त्या म्हणाल्या, हे लोक फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराचा कधीच मोर्चा काढणार नाहीत. तर कुठला मोर्चा काढतात सावरकर मोर्चा काढतात, असा चिमटा शिवानी यांनी काढला. बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि इथे असलेल्या महिलांनी सुरक्षित कसे समजावे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title :- Shivani Vijay Wadettiwar | savarkar used to say that rape is a political weapon shivani vadettiwar viral vedio

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | मविआ सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद का दिले? जयंत पाटलांचा खुलासा म्हणाले-‘राजकारणात काही गोष्टी…’

Ambedkar Jayanti 2023 | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 25 हजार पुस्तके वाटप (Video)

Maharashtra Political News | ‘बावनकुळेंना त्यांच्या पक्षात किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार?’