Shivdi-Nhava Sheva Sea Link | मुख्यमंत्री शिंदेंची संधी हुकली ‘स्टेअरिंग’ पुन्हा फडणवीसांच्या हाती (व्हिडिओ)

Shivdi-Nhava Sheva Sea Link devendra fadnavis drive on Shivdi nhava sheva sea link cm eknath shinde alongside watch
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivdi-Nhava Sheva Sea Link | शिवडी-न्हावा शेवा सी लिंकची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पाहणी केली. या सी लिंकवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाडी चालवण्याचा मोह आवरला नाही. यानंतर फडणवीस यांनी गाडीचं स्टेअरिंग हातात घेत गियर टाकला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला बसले होते. (Shivdi-Nhava Sheva Sea Link)

 

 

MMRDA कडून 21.81 किमी लांबीच्या शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचे (Shivdi-Nhava Sheva Sea Link) काम पूर्ण झाले आहे. या सगरी सेतूची युद्ध पातळीवर तयारी सुरु होती. या सेतूवरुन वाहने, मालवाहू वाहने, बांधकाम साहित्य नेणे शक्य होणार आहे. काम पूर्ण झाल्याने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शिंदे-फडणवीस हे उपस्थित होते.

शिवडी-न्हावा शेवा सी लिंकचं काम 94 टक्के पूर्ण झालं आहे. डिसेंबर 2023 पर्यंत या सी लिंकचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. या सी लिंकमुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास 20 मिनिटांत होणार आहे. शिवडी न्हावा शेवा सी लिंक 21.8 किमीचा आहे. यात समुद्रावर हा पूल अंदाजे 16.5 किमी असून या सी लिंकवर सहा लेन आहेत.

 

 

दरम्यान, आज या सी लिंकची पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गाडी चालवली.
याआधी शिंदे-फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) एकत्र प्रवास केला होता.
त्यावेळी देखील फडणवीस यांच्या हातात गाडीचे स्टेअरिंग होते. विशेष म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे मविआ सरकारमध्ये मंत्री होते, त्यावेळी समृद्धी महामार्गाची पाहणी केली होती. त्यावेळी मर्सिडीज इलेक्ट्रिक कारने (Mercedes Electric Car) प्रवास केला. त्यावेळी देखील शिंदे फडणवीस यांच्या शेजारी बसले होते. आता मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यासोबत पहिल्यांदा प्रवास केला आणि यावेळीही गाडीचे स्टेअरिंग फडणवीसांच्या हातात होते.

 

Web Title :  Shivdi-Nhava Sheva Sea Link devendra fadnavis drive on Shivdi nhava sheva sea link cm eknath shinde alongside watch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Total
0
Shares
Related Posts