वाद मिटला…! शिवेंद्रराजे-उदयनराजें यांच्यात भाईचारा ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – आमची दोन घराणी नाहीत, छत्रपतींचं घराण एकच आहे, असं वक्तव्य करत आमदार शिवेंद्रराजे यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबतचा वाद मिटवण्याचे संकेत दिल्याचे चित्र दिसत आहे.  मला फक्त आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभेची तयारी करत आहे, असं शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटण्याचे संकेत खुद्द शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहे.
याबाबत बोलताना आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, “माझी निष्ठा शरद पवारांवर आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायल्या मिळाल्या आहेत. त्यांचा सहवास आधी मिळाला असता, तर बरंच काही शिकता आलं असतं असं वाटतं. मला आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारीला लागलो आहे.” एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
इतकेच नाही तर, छत्रपतींचं घराणं एकच आहे. त्या घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, अशी कोणतीही कृती माझ्याकडून घडणार नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी उदयनराजेंसोबतचा वाद मिटवण्याचे संकेत दिले आहेत.