Shivendra Raje Bhosale | उदयनराजेंच्या ‘त्या’ वक्तव्याची शिवेंद्रराजेंनी उडवली खिल्ली, म्हणाले…

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्यातील वाद तर सगळ्यांनाच माहित आहे. हे दोघेजण एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या शिवेंद्रराजेंना जाहीर आव्हान दिले होते. उदयनराजे म्हणाले भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी एकदा समोरासमोर येऊन भ्रष्टाचार (Corruption) कुठे केला याचा पुरावा द्यावा. लोकांसमोर अथवा गांधी मैदानात मी येण्यास तयार आहे. माझा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर मी माझ्या मिशा आणि भुवया काढून टाकेन असे आव्हानचं यावेळी खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना दिले होते. (Shivendra Raje Bhosale)
त्यानंतर आता उदयनराजे यांनी दिलेल्या आव्हानाला शिवेंद्रसिंहराजें यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी भुवया काढीन, मी मिशा काढीन, समोरासमोर या’, हे उदयनराजेंचे नेहमीचेच डॉयलॉग आहेत. सातारकरांना त्याची सवय झाली आहे. प्रत्यक्षात ते त्यांचा शब्द कधीच पाळत नाहीत. जर आपण इतके महाविकासपुरुष होता, तर लोकसभेच्या निवडणुकीत का पडलात, अशा शब्दात टीका करत शिवेंद्रसिंहराजें यांनी उदयनराजे यांची खिल्ली उडवली आहे. मुंबई येथे अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना हि टीका केली आहे.
तसेच घंटागाडी निविदा प्रकरणांमध्ये वेतनाची ओढाताण झाल्यामुळे घंटागाडी चालक आत्महत्या करायला निघाले होते, हे सातारकरांनी जवळून पाहिले आहे. भुयारी गटार योजना, पंतप्रधान आवास योजना, कास, कण्हेर पाणी योजना असो कोणतीही योजना अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हि कामे दिली जातात.
हे ठेकेदार कामे नीट करत नाहीत त्यामुळे विकासाचे गाडे पुढे सरकलेले नाही.
जर आव्हान दिले तर ते नक्कीच पाळावे, असा टोलादेखील शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजे यांना लगावला.
सातारा विकास आघाडीचा भ्रष्ट कारभार सातारकरांनी गेल्या पाच वर्षांत लोकांनी पाहिले आहे,
नाशिक पुणे येथील कंत्राटदारांना कशी टेंडर्स दिली, कसे चेक काढले याची सर्व कल्पना जनतेला आहे असेदेखील शिवेंद्रराजे म्हणले आहेत.
Web Title :- Shivendra Raje Bhosale | shivendra raje bhosale slams bjp
mp udayanraje bhosale in satara
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
LPG Subsidy | नागरिकांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा
Pune Pimpri Chinchwad Crime | अटक केलेल्या आरोपीकडून दोन पोलिसांना मारहाण, वाकड परिसरातील घटना
Maharashtra Govt News | वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात 4 हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू