×
Homeताज्या बातम्याShivendra Raje Bhosale | आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना...

Shivendra Raje Bhosale | आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी काल गोडोली येथील दांडियाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ‘मैं हूँ डॉन… मैं हूँ डॉन’ या गाण्यावर भन्नाट डान्स करत दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना कॉलर उडवण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते, अशी प्रतिक्रिया देत खा. उदयनराजेंना (Udayanaraje Bhosale) टोला लगावला आहे. (Shivendra Raje Bhosale)

 

गोडोली (Godoli) येथे एका मंडळाने दांडियाचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी आ. शिवेंद्रराजेंना (Shivendra Raje Bhosale) आमंत्रित करण्यात आले होते. तिकडच्या कार्यकर्त्यांचा मान राखत शिवेंद्रराजे भोसले यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. शिवेंद्रराजे तेथे आल्यानंतर तरूणांमध्ये एकच उत्साह संचारला. यावेळी शिवेंद्रराजे यांची एंट्री होताच ‘मैं हूँ डॉन… मैं हूँ डॉन’ हे गाणे वाजवण्यात आले. मग काय तरूणांसोबत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी त्या गाण्यावर ठेका धरला.

 

डान्स केल्यानंतर शिवेंद्रराजे यांनी दांडिया खेळण्याचाही आनंद लुटला.
‘मैं हूँ डॉन… मैं हूँ डॉन’ या गाण्यावर खा. उदयनराजेंनी अनेकदा कॉलर उडवली आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी शिवेंद्रराजेंना डान्स करताना कॉलर उडवण्याची विनंती केली.
मात्र, शिवेंद्रराजेंनी याला नकार देत आपली कॉलर आपल्या मानेवर चांगली दिसते असे बोलत उदयनराजेंना टोला लगावला आहे.

 

Web Title :- Shivendra Raje Bhosale | Your collar looks best on your neck Shivendraraje bhosale to Udayan raje bhosale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lumpy Skin Disease | ‘मोदींनी नायजेरियातून आलेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला’ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अजिब आणि हास्यास्पद दावा

Udayanraje Bhosale | रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा : उदयनराजे भोसले

MNS On Shivsena | मनसेची शिवसेनेवर टीका, शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News