बारामती : अजित पवारांच्या ‘दारी’ भाजप आमदार; राजकीय चर्चांना उधाण

बारामती: काही दिवसापासून मेगा भरती करणाऱ्या भाजपला मेगा गळती लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भाजपमधील काही जणांनी घर वापसी करण्यास सुरुवात केली आहे. पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपमधील काही नेते मंडळी राष्ट्रवादीत येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यावरून राजकीय उथपालथं सुरु झाली होती. त्यातच पुणे महापालीकेचे १२ नगसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचेही बोलेले जात असतानाचा साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी बारामतीमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. शिवेंद्रराजे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून बारामतीतील ५१ च्या ५१ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत. ग्राम पंचायत निकालानंतरचा अजित पवार बारामती दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सदस्य विद्या प्रतिष्ठान इथं अजित पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत.यावेळी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी सुद्धा अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु, दोन्ही नेत्यांच्या बैठकीतील चर्चेचा तपशील अद्याप समोर येऊ शकली नाही. विशेष म्हणजे, शिवेंद्रराजे भोसले यांनी याआधी सुद्धा अजित पवार यांनी अनेक विकासकामांच्या निमित्ताने भेटी घेतल्या आहे.एवढंच नाहीतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याच्यावेळी सुद्धा शिवेंद्रराजे हे बैठकीसाठी हजर होते. शिवेंद्रराजे यांची राष्ट्रवादी पक्षासोबत जवळीक वाढत असल्यामुळे साताऱ्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळत आहे.

मध्यंतरीच्या काळात एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यानंतर अनेक भाजपचे आमदार हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. दोनच दिवसांपूर्वी सोलापूर दौरयावर गेलेले राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी भाजपमधील अनेक आमदार राष्ट्रवादीमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे दिसले. त्यातच आज पुन्हा एकदा शिवेंद्रराजे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.