Shivendraraje Bhosale | छत्रपती संभाजी महाराजांची ओळख धर्मवीरच, आमदार शिवेंद्रराजे भोसले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आतापर्यंत आपण जो इतिहास वाचला. त्यात छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) ओळख ‘धर्मवीर’ (Dharmaveer) म्हणूनच इतिहासात केली गेली आहे, त्यामुळं यावरती चर्चा होऊ नये, असं म्हणत भाजप आमदार (BJP MLA) शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. आज पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचं (Hindu Janakrosh Morcha) आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) सहभागी झाले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलत होते.

 

धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद (Love jihad) यासाठी कडक कायदे करावेत. त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन (Dharmavir Din) म्हणून साजरा करावा. या मागणीसाठी पुण्यात सकल हिंदु समाजाच्यावतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला लाल महाल (Lal Mahal) येथून सुरुवात झाली. हा मोर्चा डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत होता.

 

आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही

मागील काही दिवसांपासून सगळीकडे भीतीचं वातावरणं निर्माण झालं आहे. हिंदू समाजात देखील भीतीचं वातावरण आहे. ही भीती कमी करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. केंद्रात भाजपचे सरकार (BJP Government) आहे. शिवाय मोदीही आहेत. राज्यात देखील भाजपचं सरकार आहे. त्यामुळे मोर्चाची दखल घेण्यात येईल. शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) स्वराज्याची स्थापन केली. या स्थापनेच्या वेळी धर्माचं रक्षण करावं हादेखील मुद्दा होता. या मोर्चातून आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही आहे. आम्ही फक्त आमचा धर्म जपण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) म्हणाले.

या मोर्चात आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir),
तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर (Telangana MLA Raja Bhaiya Thakur),
तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे (Shivajirao More),
मिलिंद एकबोटे (Milind Ekbote), धनंजय देसाई (Dhananjay Desai),
निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे (Retired Police Officer Bhanu Pratap Burge) हे सहभागी झाले होते.

 

 

Web Title :- Shivendraraje Bhosale | chhatrapati sambhaji maharaj is dharmveer said by
bjp mla shivendra raje bhosale in hindu janakrosh morcha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा