उदयनराजेंच्या पराभवावर शिवेंद्रराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

सातारा, पोलीसनामा ऑनलाइन – साताऱ्यात उदयनराजेंना लोकसभा पोटनिवडणूकीत मोठा धक्का बसला आहे, शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या साताऱ्यात अखेर राष्ट्रवादीने बाजी मारत श्रीनिवास पाटलांचा विजय झाला. लोकसभा पोटनिवडणूकीच्या निकालाने भाजपला देखील मोठा झटका बसला, 95 हजार इतक्या मतांनी उदयनराजेंचा दारुण पराभव झाला. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी या पराभवावर प्रतिक्रिया दिली.

साताऱ्यामधून विधानसभा निवडणूकीत विजयी झालेल्या शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेंच्या पराभवावर भाष्य करताना सांगितले की पक्ष म्हणून आत्मपरिक्षण करण्याची भाजपाला गरज आहे. विधानसभेच्या सहा मतदारसंघांचा मिळून लोकसभेचा एक मतदारसंघ होतो. आम्ही पक्ष म्हणून आमच्या भागामध्ये काम केले पण बाकी ठिकाणी काय झाले, मताधिक्य का नाही मिळाले या गोष्टीचे पक्ष म्हणून आत्मपरिक्षण,आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.

मंत्रीपदाबद्दल बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की भाजपाकडून मी मंत्रीपदासाठीचा शब्द घेतला नव्हता. मंत्रीपद द्या तर मी येतो असे म्हणून मी भाजपामध्ये आलो नाही. मी कोणत्याही अटी आणि शर्ती ठेऊन भाजपामध्ये प्रवेश केला नाही. जर जबाबदारी दिलीच तर चांगले काम करेन. तेवढी माझी क्षमता आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर ज्याला ज्या जबबादाऱ्या दिल्या जातील त्याप्रमाणे काम करु. सरकारमध्ये राहून मतदारसंघांमध्ये चांगले काम नक्की करेन, विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला विजय हा माझा एकट्याचा विजय नसल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले.

चौथ्यांदा आमदार म्हणून निवडूण आलो असे सांगताना शिवेंद्रराजे म्हणाले की मतदारसंघामध्ये केलेली कामे, मतदारसंघात असलेला संपर्क, माझ्या वडिलांपासून आमच्या घरण्यावर येथील मतदारसंघातील लोकांचा विश्वास, पक्ष म्हणून भाजपाने मागील पाच वर्षामध्ये केलेली कामे, मुख्यमंत्र्याच्या नेतृत्व, कार्यकर्त्यांनी दिवसरात्र केलेली मेहनत यामुळे हे यश मिळाले. आता सातारा मतदारसंघातील अनेक महत्वाची कामे हाती घेणार आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यांची दूर्दशा झाली आहे त्यासाठी निधी मिळून कामाला सुरुवात करु असं शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.

पवारांच्या पावसातील सभेचा परिणाम झाला नाही –
शरद पवारांच्या भर पावसातील सभेमुळे निवडणूक पलटली का यावर विचारले असता शिवेंद्रराजे यांनी नाही असे उत्तर दिले, शरद पवारांच्या त्या एका सभेमुळे लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला असे म्हणता येणार नाही. असे असते तर तिथे विधानसभेच्या रिंगणात असणारे राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे पडले नसते. महेश शिंदे नवीन असताना देखील त्यांनी शशिकांत शिंदे यांच्यासारख्या जिल्ह्यातील मोठ्या नेत्याचा पराभव केला. सभेचा प्रभाव असता तर मला देखील इतके मताधिक्य मिळाले नसते असे मत शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा