ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काळात भाजपच्या अनेक मंडळींनी शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याने भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पण, त्यावरून आता त्यांच्या पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) यांनी टोला लावला आहे. उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन करावे, असा सल्ला शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) यांनी त्यांना दिला आहे.

उदयनराजे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांचा निषेध केला आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आता ज्यांना विश्वास राहिला नाही, ते स्वत: चे वेगळे आंदोलन करत आहेत. या आंदोलनामागे काही राजकीय विषय आहे का, काही राजकीय स्वार्थ आहे का, याची माहिती घेतली पाहिजे. राज्यपाल बदलायचे असतील, तर दिल्लीत आंदोलन करावे लागेल. यासाठी दिल्लीत जावे लागणार आहे. इथे महाराष्ट्रात दंगा करून काय उपयोग? असे शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) म्हणाले.

उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली आहे. त्यांना पदावरून हटविण्याची मागणी त्यांनी शनिवारी रायगडावरील सभेत केली.
प्रोटोकॉल तपासून राज्यपालांवर कारवाई करा. मला विश्वास आहे की, पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल.
मी त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही, असे उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले होते.

Web Title :- ShivendraRaje Bhosale | udayanraj should go to delhi and protest says shivendraraje bhosale at satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shreya Bugade | श्रेया बुगडे ‘या’ विनोदवीराची चाहती; त्याच्यासाठी केली खास पोस्ट शेअर

Prakash Ambedkar | ‘तूर्तास काही घाई नाही…’ ! उद्धव ठाकरेंच्या बैठकीत चर्चेची बातमी प्रकाश आंबेडकरांनी फेटाळली