सातारा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत झाली असून यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी विजय मिळवला आहे. यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी 26138 इतक्या मतांनी विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला आहे. दोघांमध्ये झालेल्या लढतीत अखेर अपेक्षेप्रमाणे शिवेंद्रराजे भोसले यांनी विजय मिळवला. राज्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होत असताना येथे देखील दीपक पवार विजयी होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश केलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांनी या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. त्यांच्याविरोधात भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या दीपक पवार यांनी देखील चांगलाच जोर लावला. मात्र अखेर या लढतीत शिवेंद्रराजे यांचा विजय झाला. या निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांना 82464 इतकी मते मिळाली असून दीपक पवार यांना 56326 मते मिळाली आहेत.

उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते

1) शिवेंद्रराजे भोसले (भाजप) – 82464
2) दीपक पवार(राष्ट्रवादी काँग्रेस) – 56326
3) अशोक गोरखनाथ दिक्षित (वंचित बहुजन अघाडी) – 2410
4) शिवाजी नारायण भोसले (अपक्ष) – 743
5) अभिजीत वामनराव आवाडे -बिचुकले (अपक्ष)- 567
6) नोटा – 1430

टीप : मतदानाची आकडेवारी हि निवडणूक आयोगाच्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com