सर्वांना न्याय देण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली : धायगुडे

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना यासाठी केली होती की, त्यांना राज्यातील शेतकरी सर्वसामान्य, दिन, दलीत व शेवटच्या वंचीत घटकाला न्याय देण्याचे काम करायचे होते. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करुन आपल्या राज्यात न्यायदानाची प्रथा त्यांनी शेवटच्या क्षणा पर्यंत निभावुन न्याय देण्याचे काम केल्यामुळे आज शिवरायांना जाऊन चारशे वर्ष झाली, तरी शिवरायांची जयंती आज सर्वत्र मोठया थाटामाटात साजरी केली जाते. हे जनतेचे त्यांच्या विषयीचे त्यांच्या न्यायव्यवस्थे विषयीचे प्रेम व आदर्श असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते शिवश्री अविनाश धायगुडे यांनी आपल्या व्याख्यानात बोलतांना केले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बुधवार १९ फेब्रुवारी रोजी बाजार समिती प्रांगणात शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त आयोजित शिवव्याख्यानात सुप्रसिद्ध व्याख्याते शिवश्री अविनाश धायगुडे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.बाबाजाणी दुर्राणी हे हे होते. तर व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, ॲड. मुंजाजी भालेपाटील, बाजार समिती उपसभापती एकनाथ शिंदे संचालक माधवराव जोगदंड, बाळासाहेब कोल्हे, लहु घांडगे, रूस्तुम झुटे, नारायण आढाव, राजेश्वर गलबे, भगीरथ टाकळकर, एकनाथ सत्वधर, दगडुबा दुगाणे, विश्वांभर साळवे, बाबासाहेब कुटे, सय्यद गालेब, प्रभारी सचिव बि.जी.लिपने, तुकाराम जोगदंड, सदाशिव थोरात, अलोक चौधरी, राजीव पामे, अशोक गिराम, विष्णू काळे, बी.एस. कुटे, अजय थोरे, सतिश धबडगे, अजय पाथरीकर,रिंकू पाटील, भाले, मनोहर वाघमारे, राजेश ढगे, अदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थीनीं ऋतूजा रोहीनी आसाराम शिंदे, प्रांजली डोंगरे अदीनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी बाजार समितीच्या वतीने सभापती अनिल नखाते , उपसभापती एकनाथ शिंदे व संचालक मंडळाच्या वतीने आ. बाबाजानी दुर्राणी व शिव व्याख्याते अविनाथ धायगुडे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपाळ आम्ले यांनी केले तर उपस्थितांचे आभार तुकाराम शेळके यांनी मानले. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, सरपंच, चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक, शेतकरी बांधव व शिवप्रेमी नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. या सोहळ्या निमित्त बाजार समिती परीसरात भगवे ध्वज आशा आनंदायी वातारणात शिवजन्मोत्सव सोहळा लक्षवेधक ठरला. या शिवजन्मोत्सव सोहळ्यास तालूक्यातील शिवप्रेमी नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

जातीवादी वृत्तींना धडा शिकवला पाहीजे – आ. दुर्राणी

लोकशाहीमध्ये जनतेच्या प्रश्नांना विकासाला प्रथम महत्त्व दिले पाहिजे, परंतु दुर्दैवाने तसे होतांना दिसून येत नाही. देशात सध्या विकासाला व जनतेच्या प्रश्नांना बगल देऊन सत्ता मिळवण्यासाठी जेंव्हा तेंव्हा जातीवाद निर्माण करून जातीवादाच्या माध्यमातून काही ठराविक लोक सत्ता भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा सत्तेवर येऊ पाहतात आशा देशातील जातीवादी वृत्तींना धडा शिकवला पाहीजे अन्यथा ही जातीवादी वृत्ती अधिकच फोफावली तर भविष्यामध्ये तुम्हा आम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे असे मत आ.बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात बोलतांना व्यक्त केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like