शिवजयंतीनिमित्त शहरातील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या भागात भव्य मिरवणूका निघणार असल्याने बुधवारी मध्यभागातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापरकरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 शिवजयंती बुधवारी शहरासह राज्यात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने शहरातील विविध भागात म़िरवणूका काढण्यात येणार आहेत. मुख्य मिरवणुकीची सुरुवात दुपारी चारच्या सुमारास भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर येथून होणार आहे.

त्यानंतर मिरवणूक भवानी पेठ, संत कबीर चौक, लक्ष्मी रस्ता, नाना पेठ, सोन्यामारुती चौक, फडके हौद चौक, जिजामाता चौक, शनिवारवाडा, शिवाजी रस्त्याने जाणार आहे. मिरवणुकीची सांगता शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस प्रशालेच्या आवारातील श्री शिवछत्रपती पुतळा परिसरात होणार आहे. मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

मिरणवूक मार्गावर पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली असून वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

शिवजयंतीसाठी हमाल पंचायतीकडून बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास नाना पेठेतील हमाल पंचायत भवन परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक महात्मा पुैले मंडई, बाबू गेणू चौक, भिडे वाडा, मजूर अड्डा, अप्पा बळवंत चौक, शनिवार वाड्यावरुन मार्गस्थ होणार आहे.

लष्कर परिसरात आझम कॅम्पसपासून सकाळी सव्वा आठला शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणूक पूना कॉलेज, पदमजी पोलीस चौकी, क्वार्टर गेट, संत कबीर चौक, अशोक चौक, डुल्या मारुती चौक, सोन्या मारुती चौक, लालमहलकडे मार्गस्थ होणार आहे. या मिरवणुकीची सांगता लाल महाल चौकात होणार आहे. श्री शिवजयंती महोत्सव समितीकडून शनिवारवाडा परिसरातून सकाळी नऊच्या सुमारास मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक गाडगीळ पुतळा, शिवाजी पूल मार्गे एसएसपीएमएस प्रशालेपर्यंत जाणार आहे.

मिरवणूक कालावधीत बंद असलेले रस्ते
– भवानी माता मंदीर ते रामोशी गेट ते जुना मोटार स्टॅण्ड
– जुना मोटार स्टॅण्ड ते पदमजी चौक
– ए.डी. वॅैम्प चौक ते रामोशी गेट ते संतकबीर चौक
– लक्ष्मी रोडवर संत कबीर चौक ते सोन्या मारुती चौक
– हमजेखान चौक ते देवजीबाबा चौक
– सोन्या मारुती चौक ते फडके हौद
– बुधवार चौक ते मोती चौक
– देवजीबाबा चौक ते फडके हौद
– पुरम चौकातून बाजीराव रोडकडे जाणारी वाहतूक
– अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकासह शनिवार वाड्याकडे जाणारा रस्ता
– गाडगीळ पुतळा ते जिजामाता चौक
– गाडगीळ पुतळा ते शिवाजी पुतळा
– पुरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक

You might also like