शिवजयंतीनिमित्त वाहतूकीत बदल

अशी असेल उद्याची शहरातील वाहतूक व्यवस्था

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उद्या (२३ मार्च रोजी) शहरात विविध संघटनांकडून साजरी केली जात आहे. त्यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरातील विविध मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर काही ठिकाणची वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुख्य मिरवणूक मार्ग – भवानी माता मंदिर, भवानी पेठ येथून रामोशी गेट चौक -नेहरी रोडने, ए. डी. कॅम्प परिसर, संत कबीर चौक, नानाचावडी चौक, अरुणा चौक, नाना पेठ चौकी, अल्पना टॉकीज, डुल्या मारुती चौक, हमजेखान चौक, सतरंजीवाला चौक, तांबोळी मशीद चौक, सोन्या मारूती चौक, मोती चौक, फडके हौद चौक, जिजामाता चौक लालमहल येथे विसर्जन होणार आहे.

नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा

१. नेहरु रोडवरील वाहतूक बंद केल्यानंतर पावर हाऊस कडून सेव्हन लव्हज चौकाकडे जाणाऱ्यांनी कादर चौक – क्वार्टर चौक, जुना मोटार स्टॅंड मार्गे जावे, किंवा पावर हाऊस चौक ते समर्थ पोलीस ठाणे ते शांताई हॉटेल ते क्वार्टर गेट या मार्गाचा वापर करून जुना मोटर स्टॅंडकडे जावे.

२. सेव्हन लव्हज चौकातून पावर हाऊस कडे जाणाऱ्यांनी बाहुबली चौक, राजसबाई गंगाळे पथ मार्गे जुना मोटर स्टॅंड चौक, क्वार्टर गेट मार्गे जावे.

३. लक्ष्मी रोडवरील वाहतूक बंद केल्यानंतर टिळक चौकाकडे (अलक चौक) जाणाऱ्यांनी नेहरु रोड, पावर हाऊस चौक, अपोलो टॉकीज, फडके हौद चौक, जिजामाता चौक मार्गे जावे.

४. तसेच देवजीबाबा चौकातकडून मिठा गंड चौक मार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी देवजीबाबा चौक ते दारूवाला पुल ते अपोलो सिनेमा ते पावर हाऊस चौकातून नेहरू रोडचा वापर करावा.

५. गणेश रोडवडील वाहतूक बंद केल्यानंतर जिजामाता चौकाकडे जाणाऱ्यांनी देवजीबाबा चौक, हमजेखान चौक व लक्ष्मी रोडचा वापर करावा.

६. जिजामाता चौकाकडून फडके हौद चौकाकडे जाणाऱ्यांनी गाडगीळ पुतळा, कुंभार वेस मार्गे बुधवार चौक, पासोड्या विठोबा चौक, मोती चौक, फड़के हौद मार्गे जावे.

७. गाडगीळ पुतळा ते जिजामाता चौक दरम्यान वाहतूक बंद केल्यानंतर स्वारगेटकडे जाऊ इच्छिणाऱ्यांनी कुंभारवेस, शाहिर अमर शेख चौक, मालधक्का चौक, नेहरू रोडने स्वारगेटला जावे.

८. लष्कर भागातील मिरवणू मार्ग आणि पर्यायी मार्ग – खान्या मारुती चौक चौक येथून सुरु होऊन ट्रायलक हॉटेल चौक, न्यू मोदीखानमार्गे मुक्ती चौक , उजवीकडे वळून कुरेशी मशीद, सेंट्रल स्ट्रीटने भोपळे चौक, सेंट्रल स्ट्रीट चौकी, आसुडजखान चौक येथे विसर्जन.

पर्यायी मार्ग

१. गोळीबार मैदान चौकाकडून एमजी रोडकडे येणारी वाहतूक ही वाय जंक्शन येथे बंद करून ती खाणे मारुती चौकाकडे वळून सोलापूर रस्त्याने इस्ट् स्ट्रीटकडे वळविण्यात आली आहे.

२. कोहीनूर हॉटेल चौक ते आर एस केदारी रोडने जाणारी वाहतूक बंद करून सदरची वाहतूक एमजी रोडने महावीर चौकाकडे वळविण्यात आली आहे.

३. महावीर चौकाकडून सेंट्रल स्ट्रीट चौकीकडे जाणारी वाहतुक बंद करून ही वाहतूक एम जी रोडने नाझ चौकाकडे सोडण्यात आली आहे.

खडकी परिसरातील मिरवणूक

मार्ग – शिवाजी पुतळा खडकी बाजार येथून कॅन्टोनमेंट हॉस्पीटल चौक, श्रीराम मंदिर, आसुरखाना चौक, हुले रोडने, नवी तालीम चौक, गोपी चौक, आंबेडकर चौक, क्राऊन हॉटेल चौक, टिकारा चौक डीआर गांधी चौक, महाराष्ट्र बँक मार्ग, शिवाजी पुतळा येथे विसर्जित.

You might also like