सलमान खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, हिंदूच्या भावना दुखवल्याचा ‘त्या’ पक्षाचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्याही हेच चिन्ह असल्याचे दिसत आहे. त्याच्या आगामी चित्रपट ‘दबंग ३’ च्या शुटींगला काही दिवसांपुर्वी सुरुवात केली असता मध्ये प्रदेशातील महेश्वर या धार्मिक स्थळावर शुटींग सुरु असताना शिवलिंग लाकडी वेष्टनाने झाकल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. याफोटोमुळे सलमान खानवर हिंदूच्या भावना दुखावल्या प्रकरणी भाजपाचे आमदार रामेसश्वर शर्मा यांनी हल्लाबोल चढविला आहे.

‘दबंग ३’ ची शुंटींग चा सेट नर्मदा नदीच्या तीरावर बांधण्यात आला आहे. पण शिवलिंगाचे रक्षण करणे आणि त्याचे पावित्र्य राखणे, या हेतूने शिवलिंग लाकडी वेष्टनाने झाकल्याचा दावा सलमान खानने केला आहे.

झाकलेल्या शिवलिंगचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सत्ताधारी कॉंग्रेस आणि विरोधी पक्षातील भाजप यांच्यामध्ये चांगलेच युद्ध पेटले. कमलनाथ सरकारमध्ये वारंवार हिंदूच्या भावना दुखावण्याच्या घटना घडण्याचा आरोप भाजपने केला आहे. त्याचबरोबर भगवान शंकर विषयी अनादर व्यक्त केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्याची मागणी ही केली आहे.