लोणावळ्यातील रेल्वे मार्ग ठप्प, मुंबई – पुणे मार्गावर शिवनेरीच्या दररोज 32 अतिरिक्त फेऱ्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई पुणे महामार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांचे हाल होऊ नये आणि प्रवाशांना पावसात एखाद्या अपघाताला सामोरे जावे लागू नये. यासाठी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने या मार्गावर जादा बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. कर्जत – लोणावळा रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

वाढता पाऊस आणि मुंबईकडे जाणारी वर्दळ लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय होऊ नये. यासाठी या मार्गावर शिवनेरीच्या दररोज नियमित फेऱ्या व्यतिरिक्त ३२ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
मागणीनुसार साध्या बसेस सुद्धा या मार्गावर धावणार आहेत. प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे. दिवाकर रावते यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने या मार्गावर दोन्ही बाजूने (मुंबई-पुणे) दररोज शिवनेरीच्या जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –