×
Homeक्रीडाShivpal Singh | भालाफेकपटू शिवपाल सिंग उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी; 4 वर्षाची...

Shivpal Singh | भालाफेकपटू शिवपाल सिंग उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी; 4 वर्षाची बंदी

पोलीसनामा ऑनलाईन : शिवपाल सिंगची (Shivpal Singh) गणना भारतातील अव्वल भालाफेकपटूमध्ये केली जाते. गेल्या वर्षी उत्तेजक द्रव्य चाचणीत (Stimulant Testing) अपयशी ठरल्याबद्दल नाडाच्या (Nada) डोपिंग विरोधी शिस्तपालन समितीने (Anti-Doping Disciplinary Committee) चार वर्षांसाठी शिवपाल सिंगला निलंबित (Suspended) केले आहे. त्यामुळे आता शिवपाल सिंग (Shivpal Singh) याची कारकीर्द संकटात सापडली आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा (Javelin thrower Neeraj Chopra) याच्यानंतर शिवपाल सिंगला हा दुसरा यशस्वी भालाफेकपटू आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्पर्धाबाह्य चाचणीत अपयश आल्यामुळे शिवपाल सिंगला (Shivpal Singh) तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. त्याच्या नमुन्यात मेथेंडिएनोन हे अमली पदार्थ सापडले होते. यानंतर तो स्टेरॉइड मेथेंडिएनोन चाचणीत (Steroid Methandienone Test) तो पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर अखेर त्याच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली. ऑक्टोबर 2021 ते 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत त्याचे निलंबन राहणार आहे.

शिवपालने दोहा येथील 2019 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये 86.23 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले,
जे त्याचा वैयक्तिक सर्वोत्तम प्रयत्न होता.
त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील दुसऱ्या पात्रता गटात 76.40 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह 12 वे आणि एकूण 27 वे स्थान पटकावले.
या ऑलिम्पिकनंतर त्याने कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नाही.
शिवपालने आपल्या खेळाने अनेकदा संपूर्ण देशाची मान उंचावली होती.

Web Title :- Shivpal Singh | javelin thrower shivpal singh fails dope test banned for 4 years sport news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ram Pandagale | उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार शिंदे गटात, अनुसूचित जमातीचे बडे नेते माजी आमदार राम पंडागळेंचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

CM Eknath Shinde | भामट्यांची नवी क्लुप्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बनावट सही करुन 1.31 कोटींचा गंडा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News