Shivrai Vasantik Summer Camp Pune | शिवराय वासंतिक उन्हाळी शिबिर ! “मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी शिबिराची मदत झाली’ – शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vasantik Summer Camp Pune | श्री. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ट्रस्ट (Shivsamrajya Pratishthan Trust) आणि बाल विकास केंद्र नाँर्थ डहाणूकर (Child Development Center North Dahanukar) यांच्या मार्फत 3 ते 15 वर्षीय वयोगटातील मुला-मुलींकरता श्री शिवराय वासंतिक उन्हाळी शिबिराचे आयोजन (Shivrai Vasantik Summer Camp Pune) 20 मे के 31 मे या कालावधीत केले होते. शिबिरामध्ये मुला मुलींसाठी अनेक खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजेच स्वराज्य योद्धे मुलांना समजण्यासाठी मावळा खेळ खेळण्यात आला. या शिबिरात मुला मुलींसह पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. हे शिबिर शिवसेना गटनेते पृथ्वीराज शशिकांत सुतार (Prithviraj Shashikant Sutar) यांच्या पुढाकाराने आयोजित केले होते.

 

शिवराय वासंतिक उन्हाळी शिबिराचे आयोजन (Shivrai Vasantik Summer Camp Pune) नाॅर्थ डहाणूकर काॅलनीच्या मैदानावर दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत भरविले होते. यावेळी रोज मुलांना खाऊ वाट करण्यात आले. या कार्यक्रमात विविध स्पर्धा भरविण्यात आली होती त्यामध्ये भाग घेणा-या विद्यार्थ्यांना बक्षिसेही देण्यात आली. खेळाच्या माध्यमातून तसेच मनमोकळ्या पटांगनात शिबिर आयोजन केल्याने मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या हस्ते मुलांना बक्षिसे देण्यात आली.

“लहान मुलांची मानसिक व शारिरीक वाढ व्हावी तसेच सर्वांगीण विकास, मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.’ असं पृथ्वीराज सुतार यांनी सांगितलं. ‘कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडून मोकळ्या जागेवर मुलांनी खेळावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिबिराची मदत झाल्याचे.’ ते म्हणाले.

 

या कार्यक्रमास बाल विकास केंद्राच्या प्रमुख अपर्णा वेर्णेकर (Aparna Vernekar), स्मिता वाळीबे (Smita Walibe),
बुचके सर (Buchake sir), दिपाली देशमुख (Deepali Deshmukh). अर्चना बडबडे (Archana Badbade),
सीमा भोज (Seema Bhoj), प्राजक्ता बाभुर्डे (Prajakta Babhurde). अनघा कुंटे (Anagha Kunte),
रायकर ताई (Raikar Tai), ऐश्वर्या डेरे (Aishwarya Dere), छाया हुलाळकर (Chhaya Hulalkar). फेडरेशनच्या संस्थापिका डॉ. दिपाली फाटक (Dr. Deepali Phatak), राहूल यादव (Rahul Yadav) आदी उपस्थित होते.

Web Title :- Shivrai Vasantik Summer Camp Pune | Shivrai Spring Summer Camp! “The camp helped to give a boost to the children’s artistic talents” – Shiv Sena leader Prithviraj Sutar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sachin Waze | सचिन वाझेचा माफीचा साक्षीदाराचा अर्ज विशेष कोर्टाकडून मंजूर; अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर ?

CM Uddhav Thackeray | एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले – ‘पैशांचं…’

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार साहिल पटेल एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 67 जणांवर कारवाई