PM मोदी आणि HM शाह यांना आधी फक्त ‘नेता’ मानत होतो, मात्र आता त्यांची ‘पूजा’ करतो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलेल्या आणखी एका वक्तव्यावरून वाद उभा राहण्याची शक्यता आहे. काश्मीर मुद्द्यावरून त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते कि, काश्मीरच्या बाबतीत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याकडून मोठा गुन्हा घडला होता.

नेहरूंच्या चुकीला सुधारले शहा आणि मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले कि, मी ओरिसामध्ये जे बोललो होतो ते पूर्ण जबाबदारीसह बोललो होतो. नेहरू यांच्याकडून जी चूक झाली होती ती मोदी आणि शहा यांनी सुधारली. याआधी मी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना फक्त माझा नेता मानत होतो मात्र त्यांच्या या निर्णयानंतर मी त्यांची पूजा करतो.  पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी देशातल्या सर्व महापुरुषांचा आदर करतो मात्र जो गुन्हा आहे तो गुन्हा आहे. मी पुराव्यांसह बोलत आहे.  शेख अब्दुल्ला यांच्याविषयी पंडित नेहरूंना इतके प्रेम का होते. त्यांच्या सांगण्यावरूनच हे कलम ३७० काश्मीरमध्ये लागू करण्यात आले होते. त्याचबरोबर काँग्रेसवर टीका करताना त्यांनी म्हटले कि, राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी या मुद्द्यावर संसदेत का बोलायला हवे, यावर त्यांनी उत्तर द्यायला हवे. त्याचबरोबर काश्मीरचा मुद्दा आहे द्विपक्षीय असताना पंडित नेहरूंनी तो संयुक्त राष्ट्रांमध्ये नेला.

दिग्विजयसिंह सारख्या नेत्यांमुळे काँग्रेस डुबणार

सोनिया गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपद निवडीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले कि, मला दिग्विजय सिंह सारख्या लोकांची कीव येते. ते फक्त हिंदू-मुस्लिम मुद्दाच उचलतात. त्यांच्या या मानसिकतेमुळेच ते हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये फूट पाडतात. त्याचबरोबर त्यांच्यासारख्या लोकांमुळे काँग्रेस आणखी डुबणार अशी टीकादेखील केली.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like