‘रण छोड’ गांधी बनलेत राहूल, आमदार देखील त्याच रस्त्यावर ; माजी मुख्यमंत्री चौहान यांचा ‘घणाघात’

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळं काँग्रेसमधील सर्वच जण निराश आहेत. त्यांचे लोकच त्यांना सोडून जात असतील तर त्यांचे सरकार आपोआपच आपटणार, त्यामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही असे स्पष्ट मत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्‍त केले. दिल्‍ली येथील एका कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केलं. आम्ही कुठल्याही तयारीत नाहीत, सरकार अल्पमतात आले आहे असे म्हणणारे आम्ही कोण असेही ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, राहुल गांधी रण छोड गांधी बनले आहेत. आता ते मैदान सोडून पळाले आहेत म्हणून त्यांचे आमदार देखील पळून जात आहेत.

कार्नाटकमध्ये 13 महिन्यांपासुन सत्‍तारूढ असलेल्या काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) आघाडीला शनिवारी मोठा झटका बसला. काँग्रेसचे 8 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडे राजीनामा पाठविला आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय परिस्थिती तापली आहे. राजीनामा देणार्‍यांमध्ये आमदार प्रता गौडा पाटील (मस्की), बी.सी. पाटील (हिरेकेरूर), रमेश जरकीहोली (गोकक), शिवराम हेब्बर (येल्‍लापुर), महेश कुमताहल्‍ली (अथानी), रामालिंगा रेड्डी (बीटीएम लायौट), एस.टी. सोमशेखर (यशवंतपुर) आणि एस.एन. सुब्बा रेड्डी (कोलारमधील केजीएफ़) या काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे तर जेडीएसच्या ए.एच. विश्‍वनाथ हुनसुर, एन. नारायणा गौडा आणि के.आर. पेटे आणि गोपालैय्या यांचा समावेश आहे. दरम्यान, जरकीहोली यांनी 1 जुलै रोजी फॅक्सव्दारे राजीनामा दिला होता पण त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्विकारला नव्हता. त्याचदिवशी काँग्रेसच्या आनंद सिंह यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्विकारला होता. 11 आमदारांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस-जीडीएस (सेक्युलर) सरकारवर मोठं संकट आलं आहे.

कर्नाटक विधानसभेत 225 सदस्य असून आघाडी सरकारकडे 118 आमदार आहेत. बहुमतासाठी लागणार्‍या 113 पेक्षा केवळ 5 आमदार आघाडी सरकारकडे अधिक आहेत. त्यातच आता 11 आमदारांनी राजीनमा दिल्यामुळे सरकार अडचणीत आले आहे. भाजप सत्‍ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यावरच मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजी सिंह चौहान यांनी भाष्य केलं आहे. आघाडी सरकारला समर्थन देणार्‍या आमदारांनीच राजीनमा दिला तर त्यामध्ये भाजप काहीच करू शकत नाही. काँग्रेसचे राहुल गांधी हे रण छोड गांधी बनले आहेत आणि त्यांच्याच पाठोपाठ त्यांचे आमदार देखील रण सोडून पळून जात आहेत.

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी