‘मी आता नाही घेणार ही लस’, शिवराजसिंह चौहान यांची घोषणा, सांगितले ‘हे’ कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  देशात कोरोना लसीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे, त्यापूर्वी निवेदने येणे सुरु आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी निर्णय घेतला कि ते आता कोरोना लस घेणार नाही. ते म्हंटले कि, आधी ज्या गटांचा निश्चित केले आहे. त्यांना लस दिली जाईल.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, “कोरोना लसीसाठी तयारी सुरू आहे. मी निर्णय घेतला आहे की, मी आत्ताच लस घेणार नाही, आधी इतरांनी घ्यावी आणि मग माझा नंबर येईल. ज्यांना प्राधान्य दिले आहे त्यांना लस मिळाल्यानांतर आपला नंबर लागेल. दरम्यान, कोरोना लस संदर्भात केंद्र सरकारने काही प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. त्यांच्या मते, कोरोनाची लस सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाइन कामगार, 50 वर्षांवरील आणि गंभीर आजार असलेल्या लोकांना दिली जाईल. केंद्र सरकारच्या प्राधान्यानुसार 30 कोटी लोकांना लस दिली जाईल. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनसह देशात दोन कोरोना लस मंजूर झाल्या आहेत. देशव्यापी लसीकरण कार्यक्रमही लवकरच सुरू केला जाईल.

दरम्यान, सतत लस न घेण्यासंदर्भात आणि न घेण्यासंदर्भात निवेदने येत आहेत. नुकताच समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही घोषणा केली होती कि, आपण ही लस घेणार नाही. दरम्यान, ते म्हणाले होते की, ते भाजपची लस घेणार नाही, यावर त्यांचा विश्वास नाही. जेव्हा त्यांचे सरकार येईल तेव्हा ही लस प्रत्येकास विनामूल्य दिली जाईल.