Shivrajyabhishek Din : ‘…उत्सुकतेपोटी माझ्या अंगावर तेव्हाही काटा आला होता, आज लिहितानाही येतो’ – जयंत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रायगडाच्या मध्यभागी असलेल्या दरबारात आपण उभे राहतो तेंव्हा एक सकारात्मक ऊर्जेची भावना मनात येते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची Shivrajyabhishek Din माहिती गाईड सांगत असताना अवघा राज्याभिषेक सोहळाच नजरेसमोर उभा राहिला होता. उत्सुकतेपोटी ते सर्व ऐकताना अंगावर तेंव्हाही काटा आला होता अन् आजही लिहताना येतो असा अनुभव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Water Resources Minister Jayant Patil) यांनी व्यक्त केला आहे. तसेच पाटील यांनी शिवराज्याभिषेकानिमित्त Shivrajyabhishek Din रविवारी (दि. 6) छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

‘ज्यांना उद्योग नाही ते असे रिकामे मुद्दे उकरुन काढतात’, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

‘आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे…’, खा. संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; ‘या’ तारखेला निघणार पहिला मोर्चा (व्हिडीओ)

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक Shivrajyabhishek Din ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना आहे.
खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती.
शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसाठी अन् रयतेसाठी शिवराज्याभिषेक दिन हा आनंदाचा दिवस.
याच दिवशी महाराजांच्या नेतृत्वाखाली काळोखाचे तट कोसळून स्वराज्याचा अरुणोदय झाला होता. त्यामुळे महाराजांचा राज्याभिषेक हा येणारे हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण असल्याचे पाटील (Jayant Patil) म्हणाले.
2019 मध्ये परिवर्तन यात्रेची सुरुवात रायगडावरून शिवाजी महाराजांना वंदन करून झाली. पक्षाच्या नेत्यांना गडावर येण्यास बराच अवधी होता.
म्हणून एका टुरिस्ट गाईडकडून गडाची माहिती घेतली.
गाईडने गडाबाबत फार सखोल माहिती दिल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

READ ALSO THIS :

Lockdown in Pune : …म्हणून पुण्याची तिसर्‍या स्तरात घसरण

‘या’ परिस्थितीत PF देणार 1 लाख रुपयांचा अ‍ॅडव्हान्स; जाणून घ्या

‘ज्यांना उद्योग नाही ते असे रिकामे मुद्दे उकरुन काढतात’, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये कलगीतुरा सुरुच आहे. आज पुण्यात (Pune) बोलताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सणसणीत टोला लगावला. ज्यांना उद्योग नाही ते असले रिकामे मुद्दे उकरुन काढतात, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वक्तव्यावर पलटवार केला.

त्या गोष्टीला 14 महिने झालेत
पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, जी गोष्ट झालेली आहे, तिला 14 महिने झाले आहेत. आता ज्यांना उद्योग नाही ते असले रिकामे मुद्दे उकरुन काढत आहेत, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

मराठा आरक्षणासाठी प्रयत्न
मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही मराठा आरक्षणावर काम करण्यासाठी प्रयत्न करतोय. आजच्या दिवशी मराठा समाजाला मी अश्वस्त करतो इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचा प्रयत्न करत आहोत, अशी ग्वाहीही अजित पवार यांनी दिली.

विनायक मेटे, नरेंद्र पाटलांना टोला
ही लोकं काही काळ आमच्या बरोबर होती, त्यांचा आवका किती आहे हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे फार महत्त्व देत नाही. त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन काही जण बोलत असतील तर फार महत्त्व द्यायची गरज नाही, असे म्हणत अजित पवार यांनी विनायक मेटे (Vinayak Mete) आणि नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांना सणसणीत टोला लगावला.

हे काम छत्रपतींनी शिकवलं
राज्यभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना वंदन करतो. महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देतो. रयतेचं काम कसं करायवं हे छत्रपतींनी शिकवलं. घराघरांवर, ग्रामपंचायती, कॉलेज, सगळीकडे गुढी उभारुन हा शिवस्वराज्य दिवस साजरा केला जात आहे. रायगडावर सोहळा पाहून मोठा अभिमान वाटतो, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्हा कचरामुक्त अभियानासाठी 156 कोटी
ग्रामविकास विभागाने आजचा दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने ही तसाच निर्णय घेतला आहे.
कचरामुक्त पुणे जिल्हा अभियान सुरु करण्यात आले आहे.
या अभियानासाठी 156 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दखील पैसे मंजूर करुन आणले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.