महाबळेश्वर : स्ट्रॉबेरी गार्डनच्या मधोमध फार्म हाऊस, अत्यल्प दरात मिळवा निसर्गरम्य वातावरणाचा फाइव्ह स्टार अनुभव

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहात? तर उन्हाळात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम डेस्टिनेशन ठरु शकतं. पुण्यापासून 100 आणि मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावर असलेले शिवसागर फार्म हाऊस पाचगणी – महाबळेश्वर मार्गावर स्थित आहे. थंडगार वाऱ्यात, निसर्गाच्या सानिध्यात, निवांत वातारणात क्षणभर विश्रांती घेण्यासाठी शिवसागर फार्म हाऊस या परिसरातील सर्वोत्तम फार्म हाऊस पैकी एक आहे.

महाबळेश्वरमध्ये स्थित असलेल्या या फॉर्म हाऊस परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाण आहे. येथे उंचावर असलेल्या व्ह्यू पाइंटपर्यंत ट्रॅकिंग, प्रतापगढ किल्ला आणि लिंगमाला झरा हे विशेष आकर्षण मानले जातात. याशिवाय महाबळेश्वर अतिरम्य निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.

येथे डोंगररांगांमध्ये अनेक होम स्टे देखील आहेत. महाबळेश्वर फिरुन दमल्यानंतर हे होम स्टे तुम्हाला आराम तर देतातच आणि अधिक उत्साही देखील करतात. डोंगररांगामध्ये वसलेल्या आणि हिरव्या गार वातावरणात लाल लाल स्ट्रॉबेरीने सजलेल्या गार्डनमध्ये असलेल्या फार्म हाऊसमध्ये राहण्याची मजाच काही निराळी आहे. पाचगणी – महाबळेश्वर जे फोटोग्राफीसाठी अत्यंत सुंदर ठिकाण आहेत, येथे बॉलिवूडच्या अनेक सिनेमांची शूटिंग झाली आहे. पुणे – मुंबई या शहरांना जवळ असलेले हे थंड हवेचे ठिकाण असल्याने लोकांची येथे कायम गर्दी असते. यासंबंधित माहितीसाठी तुम्ही 91-9423827032, +91-7380070707 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

खूपच सुंदर आहे शिवसागर फार्म हाऊस –
शिवसागर फार्म हाऊस भोवती स्ट्रॉबेरीचे गार्डन पसरले आहे. फार्म हाऊस आणि त्याच्या चारही बाजूंना स्ट्रॉबेरी गार्डन. येथे येणारे प्रत्येक पाहुणे (गेस्ट) येथील स्ट्रॉबेरीवर ताव मारु शकतात. अर्थात तुम्ही स्वत: स्ट्रॉबेरीच्या गार्डनमध्ये जाऊन काही स्ट्रॉबेरी काढून खाऊ त्यांची चव चाखू शकतात. शिवसागर फार्म हाऊस फॅमिलीसाठी आणि हनीमून कपलसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. या फार्म हाऊसचे वैशिष्ट्य म्हणजे येथे हनीमून कपलसाठी रुम डेकोरेट केली जाते.

संपूर्ण फार्म हाऊसचा तुम्ही फेरफटका मारला तर तुम्ही तेथील नजारा पाहून आनंदी व्हाल. या फार्म हाऊसमधील रुम अत्यंत आरामदायक आहेत. तुम्ही येथे स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये बसून निसर्गरम्य वातावरणात बसून जेवण करण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकतात. येथे लहान मुलांच्या खेळण्यासाठी बाग उपलब्ध करुन दिली आहे. शिवसागर फार्म हाऊस फॅमिलीसाठी आणि हनीमून कपलसाठी अत्यंत सुंदर आणि निवांत ठिकाण आहे.

चेक इन आणि चेक आऊटची वेळ –
शिवसागर फार्म हाऊसच्या चेक इनची वेळ सकाळी 12 वाजेपर्यंत आहे. याशिवाय चेक आऊट पूर्वी फार्म हाऊसकडून नाश्ता देखील उपलब्ध करुन दिला जातो.

फार्म हाऊसचे भाडे –
पाचगणी – महाबळेश्वर रोडवर स्थित असलेले शिवसागर फार्म हाऊसचे भाडे फार काही जास्त नाही. सामान्य दिवशी गेलात तर 2,500 ते 3,000 रुपयांपर्यंत भाडे आहे तर सणासुदीच्या दिवसात गेला तर मागणीनुसार भाड्यात थोडाफार बदल होतो.

फॅमिलीसाठी आणि हनीमून कपलसाठी निवांत आणि रम्य ठिकाण –
शिवसागर फार्म हाऊस फॅमिलीसाठी आणि हनीमून कपलसाठी सर्वोत्तम हॉटेलपैकी एक मानले जाते. येथील सुंदर, रम्य दृश्य पाहून तुमचे मन प्रफुल्लित होईल. सर्व थकवा दूर होईल. विशेष काय तर येथे एका रुममध्ये 4 लोक देखील थांबू शकतात. जर हनीमून कपल असाल तर तुमच्यासाठी तुमच्या मुडनुसार स्पेशल रुम डेकोर करुन दिली जाते. ज्याने तुमचा हनीमून स्पेशल हनीमून होऊ शकेल.

 

स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद लुटा –
येथे येणाऱ्या प्रत्येक गेस्टला स्ट्रॉबेरी मोफत दिली जाते. ज्याने तुम्ही खूश व्हालं. मुलं गार्डनमध्ये खेळता खेळता सहज स्ट्रॉबेरी काढून खाऊ शकतात. फोटो शूटसाठी देखील हे ठिकाण अत्यंत सुंदर आहे. जेथे तुम्ही डोंगरात, स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये, रुममध्ये सुंदर फोटोशूट करु शकतात.

12 रुम आणि 50 लोक थांबण्याची व्यवस्था –
शिवसागर फार्म हाऊसमध्ये 12 रुम्स आहेत आणि तेथे एकूण मिळून 50 लोक एकावेळी थांबू शकतात. पुणे, मुंबईसह अनेक शहरातून लोक या फार्म हाऊसमध्ये येऊन थांबतात. निसर्गरम्य वातावरणात जगतात, आपल्या कुटूंबासह, मित्रांसह आणि नातेवाइकांसह भरघोस आनंद लुटतात.

ऑनलाइन करु शकतात बुकींग –
शिवसागर फार्म हाऊसमध्ये तुम्ही ऑनलाइन रुम बुक करु शकतात. http://www.shivsagarfarmhouse.in/, MakeMyTrip, Goibibo, Trivago, Booking.com, Agoda या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन बुकींग करु शकतात. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही 91-9423827032, +91-7380070707 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात अशी माहिती फार्म हाऊसचे प्रमुख सागर भिलारे यांनी दिली.

शिवसागर फार्म हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठीचा पत्ता –
At- Bhilar Village,
Oppt- Elysium Resort,
Near Windsor Park,
Panchgani-Mahabaleshwar Road

+91-9423827032
+91-7380070707

फार्म हाऊस पर्यंत कसे पोहोचाल –
विकेंटसाठी कुठेतरी रम्य वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात जाण्याच्या विचारात असाल तर शिवसागर फार्म हाऊस शॉर्ट विकेंटसाठी उत्तम आहे. गुगल मॅपवर याचे अचूक लोकेशन देण्यात आले आहे. तुम्ही येथे बाइक, कार आणि ट्रॅव्हल बसने देखील जाऊ शकतात.

– पुणे – बंगळूरु हायवेने तुम्ही या फार्म हाऊसपर्यंत पोहचू शकतात.
– तुम्ही जर मुंबईहून येणार असाल तरी तुमच्यासाठी या फार्म हाऊसपर्यंत पोहोचणे अगदी सोपे आहे. तुम्ही बाइक, कार किंवा ट्रॅव्हल बसने देखील येथे पोहचू शकतात.