Shivsahyadri Charitable Foundation | ‘मुलांना गैरकृत्यापासून रोखण्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद साधण्याची गरज’ – निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsahyadri Charitable Foundation | भारतामध्ये बालगुन्हेगारीचे (Juvenile Delinquency) प्रमाण वाढत असून ते 71 टक्के प्रमाण आहे महाराष्ट्रात 2019 च्या आकडेवारीनुसार 43 हजार बालगुन्हेगारीची संख्या आहे हे प्रमाण रोखण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांबरोबर संवाद साधण्याची गरज आहे असे आवाहन निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे (Bhanupratap Barge) यांनी रविवारी पुण्यात एका कार्यक्रमात केले. (Shivsahyadri Charitable Foundation)

 

शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे (Shivsahyadri Charitable Foundation) रविवारी पुणे सातारा रस्त्यावर (Pune-Satara Road) बिबवेवाडी (Bibvewadi) येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात (Lokshahir Annabhau Sathe Natyagruha in Padmavati, Pune) राजर्षी शाहू महाराज (Rajashri Shahu Maharaj) स्मृती शताब्दी निमित्त कष्टकरी, अंगमेहनती वर्ग, रिक्षाचालक, घरेलू कामगार, हमाल, आदींच्या मुलांसाठी “वेध भविष्याचा”– 10 वी व 12 वी नंतर काय ? या विषयावर मोफत करियर मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता.

 

या मेळाव्यात बर्गे यांनी “विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडील पहिले पाऊल – पालक व समाजाची जबाबदारी ”या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.

 

याप्रसंगी करियर मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर (Vivek Velankar), शशांक मोहिते, पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, अंकुशराव असबे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, यशोदा धुमाळ संस्थेच्या अध्यक्षा अनिता धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शनपर बोलताना बर्गे म्हणाले की, कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणाचा काहीसा दुष्परिणाम मुलांवर झाला या काळात मुलांना मोबाईल वरील अभ्यास करताना मोबाईल मधील काही वाईट गोष्टी चा संबंध आला त्याचा परिणाम मुलांवर झाला त्यामुळे पालकांनी इयत्ता 10 वी 12 वी पर्यन्त शिक्षण घेत असलेल्या मुलांना मोबाईल देण्याचे टाळावे पालकांनी मुलांसमोर चांगले संबंध व वर्तन ठेवावे पत्नी व कुटुंबातील प्रत्येक सदस्यांबरोबर सभ्य भाषेत संवाद साधावा मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

करियरच्या संधी निवडताना या विषयावर मार्गदर्शन करताना श्री वेलणकर यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त करताना सांगितले की,
एनडीए, ए. एफ. एम. सी सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या संरक्षण विषयावर मोफत अभ्यासक्रम, शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था पुण्यात आहेत.
परंतु पुण्याचे प्रतिनिधीत्व त्यामध्ये नाही प्रत्येक क्षेत्रात संधी आहे.
या क्षेत्राची आवड आपल्याला हवी कष्ट करण्याची तयारी पाहिजे म्हणून करियरचा मार्ग निवडताना नावडते विषय बाजूला ठेवले पाहिजे.
कार्यक्षेत्र व अभ्यासक्रम निवडताना पुरेशी माहिती घेतली पाहिजे.
डॉ. पराग काळकर यांनी सांगितले की वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी पुण्यात 21 विद्यापीठे व अनेक संस्था आहेत.
या संस्थांमध्ये प्रशिक्षनाच्या संधी उपलब्ध आहेत.

शशांक मोहिते यांनी सांगितले की, समाजामध्ये असलेली उदासीनता दूर करण्यासाठी समाजप्रबोधन होण्याची गरज आहे.
फाउंडेशचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे (Rajendra Kondhare) यांनी प्रास्ताविक केले खजिनदार नितीन साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
श्री. अशोक देशमुख व अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले अभिषेक मोहोळ यांनी सूत्रसंचालन केले.
विक्रमसिंह लावंड, आदिनाथ थोरात, आबा बाबर, अमर पवार, दत्तात्रय भिसे यांनी या मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.

 

Web Title :- Shivsahyadri Charitable Foundation | Parents need to communicate with children to prevent children from misbehaving Retired Assistant Commissioner of Police Bhanupratap Barge

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा