काय सांगता ! होय, ‘नवस’ फेडण्यासाठी ‘चक्क’ बीड ते तुळजापूर दंडवत, ‘या’ कट्टर शिवसैनिकाची इच्छा पूर्ण

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवू दे ! मी बीडहून तुळजापूरला दंडवत घालत येईल ! असा नवस कट्टर शिवसैनिक ओंकार अरूण पवार यांनी नवरात्र महोत्सवादरम्यान आई तुळजाभवानीकडं केला होता. आई तुळजाभवानीच्या आशिर्वादानं उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. त्यामुळं ओंकार हे नवस फडण्यासाठी बीडहून दंडवत घालत तुळजापूरकडे निघाले आहेत.

नवस फेडण्यासाठी बीड ते तुळजापूर दंडवत घालत निघाला कट्टर शिवसैनिक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ओंकारनं सुरूवात केली आहे. अवघ्या 22 वर्षाचे ओंकार हे बीड शहरातील पिंगळे गल्लीत रहावयास आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सर्वांच्या साक्षीनं नवस बोलता होता. ऑक्टोबर महिन्याच्या 24 तारखेला राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला. तेव्हापासुन ओंकार यांना कुठनं कुठं वाटत होतं की उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील.

राजकीय घडामोडीत घडत असतानाच उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आणि त्यानंतर ओंकार यांना प्रचंड आनंद झाला. आई तुळजाभवानीनं आपलं ऐकलं याची जाणीव त्यांना झाली. बोललेला नवस फेडण्यासाठी आता ओंकार बीडहून तुळजापूरकडे निघाले आहेत.

Visit : Policenama.com