विधानसभा निवडणुकांमध्ये १२ जागांवर विनायक मेटेंच्या ‘शिवसंग्राम’चा दावा

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती असणार आहे नक्की आहे. त्यानुसार त्यांच्यात जागावाटपही बरोबर होणार असून उरलेल्या जागा मित्रपक्षांसाठी देणार आहेत. भाजप-सेनेचा मित्रपक्ष शिवसंग्राम पक्षानेही विधानसभेत त्यांची साथ देण्याचे ठरवले आहे. मात्र शिवसंग्राम पक्षाने विधानसभा निवडणुकांसाठी १२ जागावर दावा केला आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबतीत आमच्यावर अन्याय करणार नाहीत. असा विश्वास शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी दाखवला आहे. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर विनायक मेटे हे अकोला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी तेथे आले होते. तेथे त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकांच्या युतीच्या जागावाटपात १२ जागांवर मेटेंनी दावा केला आहे. त्यात बीड, अकोला आणि बाळापूर या मतदार संघांचा समावेश आहे. तसंच जागांसाठी तसा प्रस्ताव भाजपकडे पाठविला आहे. तर जागा वाटपासंदर्भात दोन वेळा चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितलं.

जागावाटपात आधी घटक पक्षांना जागा वाटप करण्यात येईल. त्यानंतर शिवसेना भाजप ५०-५० टक्के जागा घेणार आहेत. त्यामुळे आमच्यावर अन्याय होणार नाही, असा विश्वास असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच यंदा निवडणुकांमध्ये घटकपक्ष त्यांच्याच चिन्हावर लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, २०१४च्या निवडणुकांपासून प्रामाणीकपणे काम करत आहोत. मुख्यमंत्र्‍यांनी अनेक आश्वासने दिली. त्यातील अधिक सामाजिक प्रश्न सोडवले. मात्र त्यांना राजकीय आश्वसनांची पुर्तता करता आली नाही. त्याचे दुःख आहेच, तरी आम्ही यावेळी महायुतीचे घटक म्हणून प्रामाणीकपणे काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

आरोग्यविषयक वृत्त