परळीत धनंजय मुंडेंची ‘पावर’ वाढणार, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष पवार राष्ट्रवादीमध्ये दाखल

बीड : (परळी) पोलीसनामा ऑनलाइन – शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत अंबाजोगाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. महायुतीत शिवसंग्राम पक्ष घटकपक्ष आहे. तुळशीराम पवार यांच्या राष्ट्रवादीत येण्याचा परिणाम परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना होईल.

तुळशीराम पवार हे शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांचे निकटवर्तीय समजले जातात. बीड जिल्हाधक्षपदी तुळशीराम पवार हे कार्यरत होते. त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश झाला. प्रवेशानंतर तुळशीराम पवार यांनी विश्वास व्यक्त केला की आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करु. ते म्हणाले की आपण परळी मतदारसंघात धनंजय मुंडे हे प्रत्येकाच्या कामाला सदैव तत्पर असतात. त्यामुळे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

तुळशीराम पवार यांच्या प्रवेशाने परळी विधानसभेत मतदारसंघात धनंजय मुंडे यांची ताकद वाढणार आहे, शिवसंग्राममधून तुळशीराम आल्याने या नेत्याचा राष्ट्रवादीला निश्चित फायदा होईल असे मानले जात आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी