शिवसेनेला मोठा धक्का ! ‘या’ कारणावरून 56 पैकी तब्बल 17 आमदार ‘नाराज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला असताना शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा केला. भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी आघाडीकडे पाठिंबा मागितला. मात्र, आघाडीने पाठिंबा देण्याबाबत अद्याप काही ठोस निर्णय घेतला नसल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या मद्यावरून शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

राज्यात युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असताना शिवसेना मुख्यमंत्रीपदावर आडून बसल्याने सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. शिवसेनेने भाजपविरोधात मुख्यमंत्रीपदासाठी निर्णायक लढाई छेडली. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी पारंपारिक विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जवळीक साधली. मात्र शिवसेनेने आघाडीसोबत जवळीक साधल्याने पक्षातील 17 आमदार नाराज असल्याचे समजतेय.

शिवेसनेने हिदुत्त्वाचा मुद्दा सोडण्यावरून या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे समजतेय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी या नाराज आमदारांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले आहेत. सध्या नाराज आमदारांची समजूत काढण्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यावरून मतभेद असलेले शिवसेनेचे आमदार हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आहेत.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आघाडीसोबत गेल्यास स्थानिक राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आमदारांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीसोबत जाण्यास विरोध असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. विरोध करणाऱ्या आमदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीसोबत जाण्यावरून विरोध केला आहे की आणखी काय कारण आहे यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

Visit :  Policenama.com