अहमदनगर : अनिल राठोडांना शिवसेनेचा ‘ए आणि बी’ फॉर्म

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर शहर मतदार विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना शिवसेनेने एबी फॉर्म दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्यांना एबी फार्म दिल्यानंतर राठोड समर्थकांनी एकच जल्लोष केला.

शिवसेनेकडून नेमका कोण उमेदवारी करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात सुरू होती. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हेही शिवसेनेकडून इच्छुक होते. त्यांच्याकडून शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. मात्र शिवसेनेचे उपनेते व जुने कार्यकर्ते असलेल्या राठोड यांनी बाजी मारली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी त्यांना एबी फॉर्म दिला. राठोड हे दोन दिवसांपासून मुंबईत होते. आज सायंकाळी ते नगरमध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतील. त्यानंतर जोरदार शक्तीप्रदर्शन करून ते उमेदवारी अर्ज दाखल करतील.

शिवसेनेकडून संभाजी कदम व अनिल शिंदे हेही इच्छुक होते. आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राठोड हेच शिवसेनेचे उमेदवार असतील.

Visit : policenama.com