Shivsena Ambadas Danve On Eknath Shinde Group | दसरा मेळाव्यावरून अंबादास दानवेंचा शिंदे गटाला खोचक टोला; म्हणाले – ‘…म्हणून मैदानही तेच राहणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Ambadas Danve On Eknath Shinde Group | दसरा मेळावा ही शिवसेनेची खुप मोठी परंपरा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांनी सुरू केलेली ही परंपरा बंडखोर शिंदे (CM Eknath Shinde Group) गटाच्या दाव्यामुळे वादात सापडली आहे. दसरा मेळावा आम्ही घेणार, आम्हीच खरी शिवसेना असा शिंदे गटाचा सूर आहे. यामुळे यावर्षी शिवतीर्थावर कोण दसरा मेळावा घेणार? याबाबत संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. यावर विविध राजकीय पक्षाचे नेते सुद्धा प्रतिक्रिया देत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता या वादावरून शिवसेना नेते अंबादास दानवे (Shivsena Leader Ambadas Danve) यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. (Shivsena Ambadas Danve On Eknath Shinde Group)

 

अंबादास दानवे यांनी शिंदे गटातील नेत्यांना खोचक टोला लगावताना म्हटले की, शिवसेना पक्षाने कधीही झेंडा बदलला नाही, कधीही नेता बदलला नाही. ‘एक झेंडा, एक नेता आणि एक मैदान’ हे नेहमीच शिवसेनेचे घोषवाक्य राहिले आहे, त्यामुळे यावर्षीही शिवतीर्थावर आम्हीच दसरा मेळावा घेणार, असे दानवे म्हणाले.
ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

दसर्‍या मेळाव्याच्या वादावर अंबादास दानवे म्हणाले, शिवसेनेने कधीही झेंडा किंवा नेता बदलला नाही.
शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्याचे हे 56 वे वर्ष असेल. शिवसेना पक्षाची जेव्हा स्थापना झाली,
तेव्हापासून शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित केला जात आहे.
‘एक झेंडा, एक नेता आणि एक मैदान’ हे शिवसेनेचे नेहमीच एक वाक्य राहिले आहे.

कित्येक लोकांनी झेंडे बदलले, कित्येक लोकांनी नेते बदलले. पण 1967 पासून शिवसेनेचा तोच ध्वज कायम आहे.
नेतेही तेच आहेत. त्यामुळे मैदानही तेच राहणार आहे. म्हणून शिवसैनिकांच्या किंवा महाराष्ट्राच्या मनात शंका येण्याचे काहीही कारण नाही.
शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा काही एका राजकीय पक्षाचा मेळावा नाही, तो महाराष्ट्राच्या विचाराचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मेळावा आहे.
यादिवशी विचारांचे सोने लुटले जाते, त्यामुळे याबाबत संभ्रम आणि संशय असण्याचे काहीही कारण नाही.

 

Web Title :- Shivsena Ambadas Danve On Eknath Shinde Group | shivsena leader ambadas danve on eknath shinde group and dasara melava

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Headache | तणाव आणि पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकते डोकेदुखी, जाणून घ्या कोणती लक्षणे आहेत धोकादायक

 

Gold Price Weekly | ‘या’ आठवड्यात अचानक स्वस्त झाले सोने, परदेशी बाजारात सुद्धा घसरला भाव

 

CBSE Digilocker Marksheet | सीबीएसईने म्हटले – डिजिलॉकरवर जारी मार्कशीटला कायदेशीर मान्यता, उच्च संस्था देऊ शकत नाहीत प्रवेशाला नकार