Shivsena Arvind Sawant On Dasara Melava | महापालिकेच्या ‘त्या’ निकषामुळे ठाकरे गटाला शिवतीर्थावर मिळणार परवानगी? अरविंद सावंतांचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Arvind Sawant On Dasara Melava | शिंदे गट (CM Eknath Shinde Group) आणि भाजपा (BJP) मिळून शिवसेनेची दसर्‍या मेळाव्याच्या जागेवरून कोंडी करण्याची खेळी खेळत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क येथील जागेची मागणी केली होती, परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही न करता हे प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले आहे. तर बीकेसीतील एक मैदान दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ताबडतोब देण्यात आले आहे, यासाठी पहिला येईल त्यास प्राधान्य असा निकष लावत प्रशासनाने शिवसेनेला मैदान नाकारल्याचे म्हटले आहे. यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रकार स्पष्ट झाला आहे. दुसरीकडे शिवार्जी पार्क मैदानासाठी सर्वप्रथम अर्ज देऊनही त्यावर प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य हा नियम लावलेला नाही. यावर आता शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत (Shivsena Leader And MP Arvind Sawant ) यांनी मोठे भाष्य केले आहे. (Shivsena Arvind Sawant On Dasara Melava)

 

शिवसेना नेते अरविंद सावंत याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले की, आमचा कोणताही गट नाही, आमची शिवसेना आहे. बीकेसी मैदानावर परवानगी मिळावी यासाठी भारतीय कामगार सेनेच्या वतीने अर्ज करण्यात आला होता. आता मला अशी माहिती मिळाली आहे की, एमएमआरडीने शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यांनी पहिल्यांदा अर्ज दाखल केला म्हणून त्यांना पहिल्यांदा परवानगी मिळाली, हा निकष महापालिकेने लावला आहे. (Shivsena Arvind Sawant On Dasara Melava)

 

हाच निकष लावायचा असेल तर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे.
शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा अर्ज दाखल केला होता.
त्यामुळे शिवतीर्थावर आम्हालाच परवानगी दिली पाहिजे.
शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी अद्याप परवानगी दिली नसली तरी अजून नकारही देण्यात आला नाही.
त्यामुळे आम्हाला तिथे परवानगी नाकारली तर पुढचा निर्णय घेऊ.
पण शिवतीर्थावर आम्हाला परवानगी नक्की मिळेल, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.

 

Web Title :- Shivsena Arvind Sawant On Dasara Melava | shivsena leader aravind sawant on dasara melava shivtirth bkc ground

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

आता घरबसल्या पेन्शनर्स जमा करू शकतात Digital Life Certificate, EPFO ने लाँच केले अ‍ॅप, जाणून घ्या प्रक्रिया

30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा Demat Account संबंधित हे महत्वाचे काम, अन्यथा करू शकणार नाही शेअरची खरेदी-विक्री

MP Vinayak Raut | एकनाथ शिंदेवर टीका करताना विनायक राऊत यांची जीभ घसरली, म्हणाले…